विदर्भ ब्युरोचिफ प्रशांत शाहा
गडचिरोली: चामोर्शी तालुक्यातील रेगडी या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली असून ही इमारत कोसळण्याचा मार्गावर आहे.एक भिंत कोसळली असून येत्या पावसाळ्यात या आरोग्य केंद्रात अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही.
त्यामुळे येथे नवीन इमारतीचे तात्काळ बांधकाम होणे गरजेचे आहे.बअशी मागणी रेगडी गावातील नागरिकांनी केली आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १९ गावे जोडलेली असून यात ११ हजार ६९३ लोकसंख्या आहे.
हे आरोग्य केंद्र कवेलूचे असून सध्या जीर्णावस्थेत आहे.या इमारतीत पावसाळ्यात छतातून पाणी गळत असते.इमारतीच्या छतावरून प्लास्टिक त्रिपाल टाकलेले आहे.परिणामी उपचारासाठी येणाऱ्या व येथे भरती होणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे.हे इमारत केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत दिसत आहे.भविष्यात मोठा गंभीर धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे नवीन इमारतीचे बांधकाम त्वरीत करण्यात यावी अशी मांगणी रेगडीसह परसातील नागरिकांनी केली आहे.