गोंडपिपरी – तालुका प्रतिनिधी
तालुक्यांतील करंजी गावाला तंटा मुक्त गाव मोहिमेचा विशेष शांतता पुरस्कार प्राप्त झाला. मात्रदारुबंदी नंतरच्या काळात गावात सद्यस्थितीत अवैध दारुविक्री जोमात सुरु आहे.यासह करंजी-चेकपेल्लूर रस्त्यावर चंद्रपूर येथिल एका बड्या दारुविक्रेत्याने आपले दुकान थाटले आहे.अन बिनदिक्कतपणे दारुविक्री सुरु केली आहे.या माद्यमातून करंजी,आक्सापूर,चेकपेल्लूर आणि बोरगाव आदी गावातील मद्यपिंना सुगिचे दिवस आले आहेत.अश्यात करंजी गावात मात्र शांतता आणि सुवस्था नांदत असतांना या दारुविक्रिमुळे गावातील सामाजिक स्वास्त बिघडले असून करंजी गावासह परिसरातील गावातील अवैध दारूविक्री समुळ बंद करावी अशी मागणी गावातील काही नागरिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनानुसार पत्र परिषदेतून केली .
दारूबंदी काळापासूनच जिल्हा सीमेवरील गोंडपिपरी तालुक्यात प्रचंड प्रमाणात तस्करीतून दारू आयात केली जाते. तर सदर तालुक्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्याने रात्रपाळी नदी घाटावरून मुबलक प्रमाणात दारू साठा पुरविला जातो. यामुळे अवैद्य दारु तस्करी करणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असून तालुक्यात ठिकठिकाणी विक्रेत्यांनी दारू तस्करीचे व विक्रीचे खोलवर मुळे रुजवून अगदी राजरोसपणे दारू विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे. अशातच तालुक्यातील करंजी गावात तसेच करंजी चेक पिल्लू या मार्गावर दारू अवैध दारू विक्री त्यांनी ठाण मांडले असून खुलेआम दारू विक्रीचा सपाटा सुरू केला आहे. यामुळे परिसरातील युवक मंडळी व्यसनाधिनतेच्या आहारी गेली असून आबालवृद्धही यात गुंतले आहेत.असे असतांना या दारुविक्रीवर कुणाचेच अंकुश नसल्याचे चित्र आहे.स्थानिक पोलिस विभाग अश्या दारुविक्रिवरील तक्रारीवर मात्र थातुरमाथुर कारवाई करुन त्यांना पाठिशी घालण्याचे काम करित आहे.सोबतच करंजीच्या परिसरात गावात कोंबडबाजार,जुगार मोठ्या प्रमाणात सुरु आहे.यामुळे गावातील शांतता,सुव्यवस्था धोक्यात येत आहे.काही वर्षापुर्वी करंजी गावातील महिलांनी एकत्र येत दारुविक्री सुरु असतांना गावातील वैध दारुचे दुकान बंद पाडले.यामुळे महिला शक्तीचा विजय झाला.अन करंजी गावात शांतता आणि सुव्यवस्था नांदू लागली.या उलट आता मात्र दारुबंदीच्या काळात करंजी गावासह परिसरातील गावात दारुविक्रीला सुगीचे दिवस आले आहेत.तरी विनंती याप्रमाणे आहे की मौजा करंजी गावासह (चेकपेल्लूर परिसरातील ) होत असलेली दारुविक्री समुळ बंद करण्यात यावी अशी मागणी करंजी गावासह परिसरातील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना दिलेल्या लेखी निवेदनानुसार पत्रपरिषदेत केलेली आहे.
बॉक्स –
दारू विक्रेत्याकडून इसमास मारहाण
करंजी – चेक पेल्लुर या मार्गावरील शेत शिवारात उभारलेल्या फार्म हाऊस मधून अवैध दारू विक्री केली जाते. तर याच फार्महाउस मालक विकी साहू याने माझ्या फार्म हाऊस मधून दारूच्या पेट्या चोरल्याच्या कारणावरून बुधवार दि. 3 मार्च रोजी करंजी येथील बंडू कवडु भोयर याला आपल्या फार्महाऊसवर नेऊन मारहाण केली. व त्यांच्याकडील रोख रक्कम 2400 रुपये तसेच मोबाईल जप्त केला.यासंदर्भात दि. 4 मार्च रोजी गोंडपिपरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यास गेलेल्या बंडू भोयर याची तक्रार दाखल करन्या ऐवजी पोलीस ठाण्यातील जमादाराने थेट विकी शाहू या दारूविक्री त्याला द्वारे माहिती देऊन बंडू भोयर याला एका शीपायासोबत पाठवून त्याचा मोबाईल परत करण्यास सांगितले. व मारहाणीचा गुन्हा दाखल न करता परस्पर वाद मिटवण्याचा तसेच दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कुठलीही कारवाई न करता कारवाईतून मुभा देण्याची व दारू विक्रीला खतपाणी घालण्याचे कार्य गोंडपिपरी पोलिसांनी केल्याचा आरोपकरीत बंडू कवडु भोयर याने पत्रकार परिषदेत आपबिती कथन केली.