विदर्भ ब्युरोचीफ प्रशांत शाहा
रेगडी: चामोर्शी तालुक्यातील एकमेव व प्रसिद्ध असलेले पर्यटक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेगडी या गावातील मुख्य मार्गाची बिकट परिस्थिती झाली असून या मार्गावर अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडलेले आहे. रस्त्याच्या कडेतील मुरुमाचे भरण नसल्याने एकावेळी दोन वाहन जाण्यास अडचण निर्माण होत आहे.
मागील सात ते आठ वर्षापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर अजूनही शासनाने या रस्त्याकडे पाठ फिरवून पाहिले नसल्याने रेगडी येथील गावातील मुख्य रस्ता संपूर्ण पने उध्वस्त झाल्याचे चित्र आहे.
गावातील मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात या मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचून राहत असते. तरी शासनाने रेगडी या गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरनाचे काम नव्याने करावे अशी मागणी रेगडी येथील गावकऱ्यांनी केली आहे..