पोंभुर्णा: भूमिपुत्र ब्रिगेड पोंभुर्णा तर्फे पहिल्या शिक्षिका,स्त्री मुक्तीच्या जननी,मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी आली. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्प माल्यार्पण करण्यात आले.
त्यानंतर दोन मिनिटांचे मौन पाडून अभिवादन करण्यात आले.
पुन्हा कोरोनाने डोके वर केले आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, भूमिपुत्र ब्रिगेड तर्फे मास्कचे वाटप करण्यात आले.
या वेळी दयानंद गुरनुले, आनंदराव घुबडे, पंकज कोटरंगे, रोशन गुरनुले, मंसराम घुबडे, श्रीकांत शेंडे, रुपंचंद गुरनुले, अमन गुरनुले उपस्थित होते.