चंद्रपुर: लालपेठ जुनीवस्ती येथील कॉंक्रीट रोड व नालीच्या बांधकामासाठी १९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या कामाचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेविका मंगला आखरे, यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक अमोल शेंडे, कलाकार मल्लारप, गौरव जोरगेवार, हरमन जोसेफ, राजेंद्र आखरे, शंकर मेश्राम, रुपेश माकोडे, राजू वानखेडे, शेख नासिन, गजानन धनकर आदिंची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत शहरातील विविध विकास कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. यातील अनेक कामे प्रगतीप्रथावर आहे. दरम्याण लालपेठ जूनी वस्ती प्रभाग क्रंमाक १४ येथील रोडच्या कॉंक्रिटीकरणासाठी व नालीच्या बांधकामासाठी स्थानिक विकास निधी अंतर्गत १९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नूकतेच या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी फावडा मारुन विधिवत कामाचे भूमिपूजन केले. कोरोना संकटामूळे विकास कामे थंडावली आहे. असे असले तरी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात विकासाची गती थांबणार नाही या दिशेने माझे नियोजन सुरु असून विविध निधी अंतर्गत शहरातील अनेक विकास कामे केल्या जात असून यातील काही कामे पुर्ण झाली आहे. तर काही कामे प्रगतीपथावर आहे. लालपेठ जूनी वस्ती येथील रस्ता तयार करण्यात यावा अशी नागरिकांची जूनी मागणी होती. या संदर्भात प्रभागातील आमचे शहर संघटक अमोल शेंडे यांनी निवेदन दिले होते. त्यामूळे येथील नागरिकांची समस्या लक्षात घेता या रस्त्याच्या कामासाठी माझ्या निधीतून १९ लक्ष रुपये मला देता आले याचे समाधान असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले तसेच येथील समस्या माझ्या पर्यंत सतत पोहचाव्यात अशी आशाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. या भुमीपूजन कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.
लालपेठ जूनी वस्ती येथील विकास कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन…
RELATED ARTICLES