चंद्रपुर: आदिवासी समाजाचे विश्वविख्यात क्रांतीकारी भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा सन्मानाने पूर्ववत स्थापण करा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून आज आदिवासी नेत्यांच्या शिष्टमंडासह त्यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेतली असून सदर मागणी संदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. यावर लवकर तोडगा काढण्याचे आश्वासनही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहे. यावेळी क्रांतीवीर नारायनसिंह उईके आदिवासी विकास संस्थेचे अशोक तुमराम, यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, आदिवासी नेत्या रंजना किन्नाके, यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाच्या शहर प्रमुख वैशाली मेश्राम, प्रदिप गेडाम, प्रिती पेंदोर, जितेंद्र बोरकुटे, जमुना तुमराम आदिंची उपस्थिती होती.
क्रांतीविर बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे श्रद्वास्थान आहे चंद्रपुर येथील आदिवासी संघटना व समाज बांधवांच्या पुढाकाराने रेल्वे स्थानकाजवळ भगवान बिरसा मुंडा चौक चंद्रपुर येथे क्रांतीविर बिरसा मुंडा यांचा पुतळा समाजाच्या लोक वर्गणीतुन उभारण्यात आला होता परंतु महानगर प्रशासनाने २७ फेब्रुवारीला समाज बांधवांना कोणतीही पूर्वसुचना न देता पहाटेच्या शांतते हा पुतळा हटविला. त्यामुळे आदिवासी समाजामध्ये रोष असून त्यांच्या वतीने आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दरम्याण आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी आदिवासी नेत्यांच्या एका शिष्टमंडळाला सोबत घेवून जिल्हाधिका-यांशी बैठक करत चर्चा केली. हा पूतळा सन्मानाने पूर्ववत स्थापण करण्यात यावा अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. लोकभावना असलेल्या श्रध्दास्थानांच अशा प्रकारची विटंबना करणे योग्य नाही. महानगर पालीकेने हा पुतळा बसविण्यासाठी पूढाकार घ्यावा यासाठी निधीची आवश्यकता असल्यास तो आमदार निधीतून देणार असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. जिल्हाधिका-यांनीही यावेळी सकारात्मक चर्चा करत यावर लवकरात लवकर तोढगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.