जाम: आज दि.२३/०३/२०२१ रोजी जाम जिल्हा वर्धा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये अशोक अंबागडे सर यांनी गृहिनीनी स्वतःच्या कलागुणांचा उपयोग करून गृह उद्योगामध्ये कसे बदलावेत व त्यांना त्या उद्योगामध्ये कसे रूपांतर करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. गृहिणी पहिलेच उद्योजक आहे पण त्यांना त्यांची ओळख नाही हे त्यांना कळून दिले. तसेच त्यांना असे पण म्हटले की तुम्ही जेव्हा गृहिणी आपल्या कुटुंबाचे योग्य प्रकारे नियोजन करू शकतात, त्यासोबतच त्यांना त्यांच्या कलागुणांना स्वतः ओळख असे सांगितले.
उद्योगाबाबत विशेषतः माहिती दिली व त्यांचे मत जाणून घेतले. ग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळामध्ये सहभागी होऊन त्यांना कशाप्रकारे उद्योग बाबतचे मार्गदर्शन होईल व त्यांना रोजगार मिळेल याची माहिती दिली.
या कार्यक्रमामध्ये अशोक अंबागडे सर (ग्रामीण भारत म.गृ. उ.मंडळ) मा.किसन बोबडे सर, (ग्रामीण भारत म.गृ. उ.मंडळ) मा. अंशुल कांबळे सर (ग्रामीण भारत म.गृ. उ.मंडळ ) मा. राहुल पाटील ( ग्राम. सदस्य) अभिलाष गिरडकर,( ग्रामीण भारत तालुका समन्वयक ) सुशीला सातपुते, जयश्री कोरडे,अर्चना सातपुते,एकता कांबळे, ( ग्रामीण भारत तालुका समन्वयक )अश्विनी मुडे ( ग्रामीण भारत तालुका समन्वयक ) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.