अवघ्या जगाने कोरोनाची धास्ती घेतली आहे. मात्र त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट म्हणजे जगात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.88 टक्के आहे.
भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक:
भारतात हेच प्रमाण 98.86 टक्के म्हणजे जगात सर्वाधिक आहे आणि महाराष्ट्रात हेच प्रमाण 98.48 टक्के इतके आहे.
सावध रहा परंतु घाबरून जाऊ नका
🔖 जगाच्या इतिहासात अशाही काही साथी येऊन गेल्या की, ज्यामध्ये मृत्यूदर 50 टक्क्यांच्या आसपास होता.
🔖 काही साथींमध्ये तर जगाच्या पाठीवरील निम्मे लोक मृत्युमुखी पडले होते.
🔖 त्या भयावह साथींच्या तुलनेत कोरोनाचा मृत्यूदर अत्यंत कमी आहे, ही सर्वांसाठीच दिलासादायक बाब आहे.
🔖 कोरोनातून बरे होणार्यांची जगातील सरासरी 97.88 टक्के इतकी आहे. त्याचप्रमाणे भारताचा मृत्यूदरही कोरोनाग्रस्त टॉप टेन देशांच्या तुलनेत कमी म्हणजे केवळ 1.14 टक्के आहे.
देशातील प्रमुख राज्यांचा मृत्यूदर
• महाराष्ट्र : 1.52 टक्के
• केरळ : 0.38 टक्के
• कर्नाटक : 1.11 टक्के
• तामिळनाडू : 1.28 टक्के
• आंध्र प्रदेश : 0.75 टक्के
• उत्तर प्रदेश : 1.07 टक्के
• दिल्ली : 1.37 टक्के
• पश्चिम बंगाल : 1.53 टक्के
• गुजरात : 1.29 टक्के
• मध्य प्रदेश : 1.05 टक्के
💉 सध्या जगासह देशात आणि राज्यात चाचण्या आणि लसीकरण मोहीम अतिशय तीव्र गतीने राबविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाची लागण होताच रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता तातडीने योग्य उपचारांवर भर देण्याची आवश्यकता आहे.