बळीराम काळे,जिवती
जिवती : (ता.प्र.) प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी ग्रामसेवक संटनेने असहकार आंदोलन सुरूकेले.संबंधित
विभागाला समस्यांविषयी निवेदने देऊनही ग्रामसेवकांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. महाराष्ट्र ग्रामसेवक तालुका जिवतीच्या वतीने संघटनेचे तालुका मुन्ना सिडाम यांच्या नेतृत्वात सवंर्ग गटविकास अधिकारी डॉ.भागवत रेजीवाड यांना निवेदन देण्यात आले.
परंतु ग्रामसेवक यांच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन वरिष्ठांना देऊन सुद्धा मागण्या मान्य नाही झाल्यामुळे संघटनेने मंगळवारपासून असहकार आंदोलन पुकारण्यात आले.सुरू असलेल्या असहकार आंदोलनात जनतेची तसेच विकासात्मक कामे केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.परंतु जिल्हा परिषद व पंचायत समितीत्यांच्या संभावर बहिष्कार राहणार आहे.असे मुन्ना सिडाम, अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना जिवती यांनी व्यक्त केला आहे.
ग्रामसेवक यांना कोरोना विमा कवच मंजुर करावे.सेवापुस्तके अद्यावत करून लाभ देण्यात यावा,यासह विविध ३५ मागण्या निवेदनात नमूद आहे.मागण्या मान्य नाही झाल्या तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी मुन्ना सिडाम,विनोद शेरकी,अजय राऊत,बोरकर,पोडे,वऱ्हाडे आदींनी दिला आहे