बळीराम काळे,जिवती
जिवती:(ता.प्र.) तालुक्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा जिवती येथे मोठ्या उत्साहात थाटामाटाने नुकताच आयोजित करण्यात आला.सकाळी १०:३० वाजता समितीचे अध्यक्ष प्रा.सुग्रीव गोतावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
नंतर पंचशील ध्वज ते अण्णा भाऊ साठे पुतळ्याच्या ठिकाणापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माझी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,खासदार बाळु भाऊ धानोरकर,आमदार सुभाष धोटे,माझी नगर अध्यक्ष अरुण धोटे होते.मातंग समाज समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा.सुग्रीव गोतावळे, डॉ.मिलिंद शिखारे,नर्सिंग मोरे, नगराध्यक्ष कविता आडे,अमर राठोड,संजय कथाडे,राजू येले,गणपत आडे,महेश देवकते,विनोद दातात्रय,आनंद भालेराव,प्रकाश कांबळे,पुष्पाताई नैताम, अनिता गोतावळे, जी.एस.कांबळे, डॉ.अंकुश गोतावळे, देविदास कांबळे, दत्ता तोगरे, दत्ता दोरे,प्राचार्य लिंबोरे यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक गोतावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन जी.एस.कांबळे यांनी व्यक्त केले.तसेच यावेळी मोठ्या संख्येनी नागरीक व महिला वर्ग यांनी उपस्थिती दर्शवली होती.