श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक चंद्रपूर)
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवाडा (खुर्द) तालुका पोंभूर्णा जिल्हा चंद्रपूर येथे कार्यरत उच्च श्रेणी मुख्याध्यापिका यांना गोंडवाना विद्यापीठाची शिक्षणशास्त्र विभागाची डॉक्टरेट मिळाली आहे.
त्यांचा विषय होता,’ग्रामीण भागातील मुलींच्या शैक्षणिक ब व्यावसायिक अभिरुची आणि शिक्षणाच्या विविध स्तरावर येणाऱ्या अडचणींचे चिकित्सक अध्ययन’
त्यांच्या संशोधनाचे क्षेत्र होते चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा या दोन्ही जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेणाऱ्या 1000विद्यार्थिनींचे त्यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण करून अध्ययन केले होते. सौ अलका ठाकरे यांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उत्कृष्ट कार्य केलेले असून आपल्या शैक्षणिक अनुभवाचा आधारे त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शैक्षणिक समस्या मांडलेल्या आहेत तसेच त्यावर उपाययोजनाही सुचविलेल्या आहेत.
त्यांच्या या संशोधनाचा उपयोग चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणींवर उपाय योजना करण्यासाठी शासकीय स्तरावर होऊ शकतो. सौ अलका दिपक ठाकरे या केवळ शैक्षणिक क्षेत्रातच कार्यरत नसून विविध सामाजिक संघटनांसोबत जुळून असून सामाजिक कार्यात सातत्याने सहभागी असतात. त्यांनी स्काऊट गाईड चळवळीच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील स्काऊट मेळाव्यामध्ये भारताचे नेतृत्व केलेले आहे.
त्या उत्कृष्ट वक्त्या असून महिलांसाठी व मुलांसाठी उत्कृष्ट समुपदेशक सुद्धा आहेत. त्यांना डॉक्टरेट मिळाल्यामुळे विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.