संपूर्ण राज्यभरातील राज्य मार्ग, महामार्ग तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवरही बेवारस फिरणाऱ्या गुराढोळांमुळे अनेक अपघात घडले आहेत. परिणामी अनेक अपघातात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागातील कोंडवाड्यांची झालेली दुरावस्था व त्यांच्या दुरुस्तीसाठी निधीचा अभाव यामुळे बेवारस फिरणाऱ्या गुरांना कोंडवाड्यात कोंडणे नगर व ग्राम प्रशासनाला अवघड जात असून कधीकाळी कारवाई अंति केवळ दंड रक्कम आकारून गुरांना सोडले जाते. याचा आर्थिक भार नेहमीच शेतकऱ्यांवर पडतो. तर वारंवार दंड आकारणी करूनही ज्या गुरांची कोंडवाड्यातून सुटका केली जात नाही. अशा गुरांच्या संगोपणाकरिता विशेष निधीची तरतूद करून पशुधन संवर्धनासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. अशी मागणी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात करून सरकारचे लक्ष वेधले.
हल्ली शहर ते ग्रामीण परिसरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांनी सर्वत्र हौदोस घातला आहे. यामुळे महामार्ग, राज्य मार्ग व ग्रामीण रस्त्यावर अपघाताचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. अनेकदा अशा मोकाट फिरणाऱ्या गुरांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. मात्र शहरी व ग्रामीण कोंडवाड्यांची झालेली दुरावस्था व त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधीचा अभाव यामुळे रस्त्यांवर फिरणाऱ्या गुराढोरांना कोंडवाड्यात कोंडण्यासाठी नगर व ग्राम प्रशासन असमर्थ ठरत असते. हीच समस्या संपूर्ण राज्यभरातील असून या गंभीर समस्येकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन जिल्हा नियोजन विकास निधी अंतर्गत विशेष निधीची तरतूद करावी. तसेच एखाद्या शेतकऱ्याची जनावर वारंवार रस्त्यांवर मोकाट फिरत असताना त्या मालकावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र संबंधित शेतकरी हा एक किंवा दोनदा दंड भरून जनावरांची सुटका करतो. तर वारंवार कारवाई झाल्याने तसेच जनावरांचे वयोगटांनुसार व आवश्यकता जाणून अनेक शेतकरी कोडंवाड्यातील जनावरांची सुटका करत नाहीत. अशा वेळेस जनावरांचे संगोपन करायची कसे? असा कठीण प्रश्न नगर व ग्राम प्रशासना समोर उभा ठाकला असतो. या समस्येला समूळ नष्ट करण्यासाठी तसेच कोंढवाड्यातील जनावरांच्या संगोपण व संवर्धनाकरिता शासनाने विशेष निधीची तरतूद करून पशुधन संगोपन, व संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा. अशी मागणी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. त्यांच्या या मागणी वर सरकारनी सकारात्मक प्रतिक्रिया देऊन ठोस पाऊल उचलणार व नगर व ग्राम प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणाऱ्या बेवारस फिरणाऱ्या गुराढोरांच्या संवर्धनासाठी निधी प्राप्त करून देणार असा सकारात्मक प्रतिसाद दिला.