दिनांक २६/०२/२०२३ ला उप्परवाही, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर येथे अखिल भारतीय मादगी सामाजिक संघटना च्या वतीने भव्य समाज प्रबोधन मेळावा तथा जेष्ठ नागरिक, नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार, तसेच सांयकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वनिता लाटेलवार, प्रदेश कार्याध्यक्ष अखिल भारतीय मादगी सामाजिक संघटना तर उदघाटक गीता सिडाम सरपंच ग्रामपंचायत उप्परवाही सहउदघाटक जयदेव त्रिशुलवार प्रदेश उपाध्यक्ष व सुनिल त्रिशूले, प्रदेश संघटक स्वागताध्यक्ष म्हणून शंकर पेगडपल्लीवार तर प्रमुख मार्गदर्शक डाँ. कुलभूषण मोरे, प्रेम जोतपोरवार. राजेश डोडीवार प्रदेश महासचिव, प्रा. दिलीप ईग्रवार प्रदेश सचिव उपस्थित होते. मादगी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाने अविरतपने समाज प्रबोधनाचे मेळावे घेऊन समाजाला त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव करून देत राहणे गरजेचे आहे. त्याचे हक्क व अधिकार याची जाणीव झाल्याशिवाय समाज मुख्य प्रवाहात येणे शक्य नाही. त्यासाठी समाजातील सुशिक्षित वर्गाणी पुढे येऊन सामाजिक दुर्बल घटकांना सक्षम बनविण्यासाठी अविरतपने झटत राहणे आजची काळाची गरज आहे असे सर्व मार्गदर्शकांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. संघटनेचे महासचिव राजेश डोडीवार यांनी आजपर्यंत संघटनेनीं संघटित होऊन समाज उपयोगी केलेली कार्य, समाज उपयोगी घेतलेले निर्णय, आलेल्या अडचणी त्यावर संघटनेने केलेली मात, संघटनेची पुढील वाटचाल याविषयी आपले विचार मांडले. तसेच अध्यक्ष म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष वनिता लाटेलवार, प्रदेश कार्याध्यक्ष यांनी आपल्या मनोगतातून समाजाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक प्रगतीसाठी असे समाजाचे मेळावे मोठ्या प्रमाणात होत राहणे गरजेचे आहे. मादगी समाज हा लढवय्या समाज आहे. त्यासाठी त्याने काही जुन्या चालीरीती सोडून देऊन आधुनिक युगातील आव्हान स्वीकारून वाटचाल करणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे समाज उन्नतीच्या कार्यात महिलांनी सुध्या मागे न राहता पुरुष्याच्या खांद्याला खांदा लावून कार्य केल्यास महिलांची सुद्धा प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. समाज जागृतीचे कार्य अविरत चालू राहिल्यास समाज मुख्य प्रवाहात येण्यास वेळ लागणार नाही. असे अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी कोल्हे, प्रास्ताविक शंकर पेगळपल्लीवार जिल्हाध्यक्ष चंद्रपूर तर. आभार बुद्धेश्वर गोरडवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी कार्यांसाठी कोरपना तालुका अध्यक्ष ईश्वर कन्नुरवार, उपाध्यक्ष अनिल अरकीलवार, सचिव बुद्धेश्वर गोरडवार, रमेश चिपाकृतीवार, भीमराव पेगडपल्लीवार, अतुल पेगडपल्लीवार, रवींद्र पेगडपल्लीवार, प्रदीप घागरे, सुरेश तोटापल्लीवार, राकेश पुंगुरवार, रवींद्र शिंदेकर, अंबादास मोहुर्ले रवी येलमुलवार तसेच सर्व कोरपना तालुक्यातील सर्व पदाधिकारींनी यांनी अथक परिश्रम घेतले.