गोंडपिपरी: तालुक्यात मक्काचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होत आहे.परंतू विक्रीसाठी मार्केट उपलब्ध नसल्याने शेतकर्याना मक्याचे योग्य बाजारभाव मिळत नाही.परिणामी शेतकर्याचे आर्थिक नुकसान होत असून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
शेतकर्यावर येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून गोंडपिपरीत मक्का खरेदी केंद्र लवकरात लवकर सूरू करण्यात यावी. याकरिता तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार, भंगाराम तळोधीचे माजी उपसरपंच मारोती अम्मावार , नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईंद्रपाल धूडसे,स्वप्नील अनमूलवार, महेंद्रसिंह चंदेल,गणपती चौधरी, संदिप पौरकर,विजय पेरकावार ,चंद्रजित गव्हाचे,समीर निमगडे,निलेश पूलगमकर,सूहास माडूरवार, रितेश वेगीनवार, आदि उपस्थित होते.