राजुरा- 2023 या सत्रात झालेल्या देशपातळीवरील नीट परीक्षेत 720 पैकी 600 गुण घेऊन मंथन विजय कानकाटे याने यश संपादन केले.
त्याचा हा दुसरा प्रयत्न आहे. त्याला पहिल्या प्रयत्नात 450 गुण मिळाले होते. अधिक मेहनत घेण्याची त्याची जिद्द असल्यामुळे तो नांदेड येथे भाड्याने खोली करून राहत होता. वर्षभरात तो एकदाही गावाला आला नाही. आई-वडिलांना सुद्धा भेटायला येण्यास त्याने मनाई केली होती.
मंथनने सिद्ध करून दाखविले की जर आपली अभ्यास करण्याची जिद्द असेल आणि जीवनात यशस्वी व्हायचेच आहे असे ठरविले तर यश सुद्धा तुमच्यापासून लांब राहू शकत नाही याचे हे जिवंत उदाहरण आहे.
यावर्षी दोन विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी म्हणजे 720 गुण मिळविले आहे. एक तामिळनाडू व दुसरा आंध्रप्रदेशचा विद्यार्थी आहे.
मराठा सेवा संघ, शाखा राजुरा तर्फे *लोकराजे शिवराय* हे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन मंथन व त्याच्या आई-बाबाचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश पारखी तसेच संभाजी साळवे, विजय मोरे, मधुकर मटाले, नंदुभाऊ वाढई, बापुराव मडावी उपस्थित होते.