राजुरा: तालुक्यातील वरुर रोड येथील सरपंच गणपत पंधरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री पिक विमा योजना बाबत सभेचे आयोजन करण्यात आले. सदर सभेस तालुका कृषि अधिकारी चेतन चव्हाण यांनी, शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया विमा हप्ता भरावयाचा असून उर्वरित विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत विमा कपंनीस जमा करण्यात येत आहे. सर्व शेतकरी बांधवानी पिक विमा काढावा तसेच पिक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवावी किंवा कृषि विभागाकडे लेखी कळवावे असे मार्गदर्शन केले. तसेच कृ.प.एन कांबळे व कृषि सहायक,दिपक काळे यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषि यांत्रिकीकरण, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना,प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना ,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फलबाग लागवड नाडेप,युनिट कपोस्ट युनिट ,पी. एम. किसान ई-केवायसी व बँक आधार सिडींग,नामशेश होत असणाऱ्या राळा, बाजरी, ज्वारी, नाचणी राजगिरा या तृणधान्याचे आहारातील महत्व,शेततळे योजना,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शंभर टक्के अनुदानवर फलबाग लागवड योजना, गांडूळ युनिट, व्हर्मी कपोस्ट युनिट व विविध योजणेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील चौथले, शेतकरी उपस्थित होते.