राजुरा ते सिंधी मार्गे अमृत गूडा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १६ या रस्त्याचे रुंदीकरण आणि छोट्या मोठ्या पुलांची नव्याने बांधनी करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे परंतु प्रशासनाकडून सिंधी – धानोरा नाल्यावरील क्रमांक २३/३०० या नवीन पुलाचे काम न झाल्याने पावसाळ्यात १० ते १२ फुट पाणी येत असल्याने यावरून रहदारी करिता मार्ग १५-१५ दिवस बंद असते याचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या नवीन पुलाच्या कामाला प्रथम प्राधान्य न देता जे पुल पाण्याखाली जात नाही अशा पुलाच्या कामाला प्रथम प्राधान्य देण्यात आले असून यामुळे महत्वपूर्ण रहदारी असलेला सिंधी धनोरा मार्ग पावसामुळे सातत्याने बंद असतो तसेच सिंधी – विरुर स्टे या मार्गावरील प्रधान मंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत टिआर३ या रस्ताचे काम सुरू आहे परंतु याही मार्गाच्या नाल्यावरील पूलाचे काम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे या मार्गाने पावसाळ्यात प्रवास करणाऱ्या विशेषतः विरुर स्टे हे परिसरातील मुख्य बाजारपेठ, माध्यमिक शाळा कान्वेट आणि प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने सिंधी, नलफडी, मुर्ती, धानोरा, विरुर स्टे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे म्हणून प्रमुख जिल्हा मार्ग १६ या मार्गावरील सिंधी – धानोरा नाल्यावरील २३/३०० नवीन पूलाचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने सिंधी येथील उपसरपंच रामभाऊ ढुमणे यांनी प्रशासनाकडे केली आहे.