वरोरा:- तालुक्यातील बामर्डा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गावाला जोडणारा रस्ता पूर्ण खराब झाला आहे. गावाचे अंतर्गत मुख्य रस्ताला पांढण रस्त्याचे स्वरुप आले आहे. इथे लोक राहतात की जनावर अशी अवस्था आहे. अनेक अपघात घडत आहेत. लोकांचा जीव जावून सुद्धा लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग झोपेत आहेत. नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. साध पायदळ चालणे अवघड झाले आहे. अनेक लोक मोटारसायकल ने पडले आहेत. दररोज अपघात घडत असून या भागातील नागरिकांना संकटाचा सामना करावा लागतो आहे. संतप्त नागरिकांनी या बाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना सैनिक अभिजित कुडे याना या बाबत तक्रार केली असता तात्काळ रस्त्याचे काम करावे अन्यथा शिवसेना कार्यपद्धती ने काम करू असा इशारा अभिजित कुडे यांनी दिला. नागरिकांनी रस्त्यातील खड्डाला हार घालून आदरांजली वाहिली व या मुर्दाड प्रशासनाचा निषेध व्यक्त केला सामाजिक कार्यकर्ते वसंत साळवे व अभिजित कुडे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी वैभव देवतळे, रोशन भोयर, सुरेश ढोके, विकास ढोके,सुरेश साळवे,सुनील साळवे, नीलेश सपाट, तेजस हरबळे,बळीराम ताजने, सुदर्शन आत्राम, दशरथ हरबळे व गावकरी उपस्थित होते.