प्रलय म्हशाखेत्री (विदर्भ ब्यूरो चीफ)
चंद्रपूर : ७ ऑगस्ट मंडल दिनाचे औचित्य साधून ओबीसी , व्हीजेएनटी आणि एसबीसी जनजागृती अभियांतर्गत विदर्भातील सात जिल्ह्यात दि. ३० जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत निघालेल्या मंडल यात्रेचे विदर्भात जोरदार स्वागत करण्यात आले. सदर यात्रा ३० जुलै रोजी नागपूर येथील संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढील प्रवासाला रवाना झाली. या यात्रेचा समारोप कार्यक्रम दि. ६ ऑगस्ट रविवारला सायंकाळी सहा वाजता चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दादासाहेब कन्नमवार सभागृहात आयोजित केला आहे.
जात निहाय जगगणना झाली पाहीजे. या प्रमुख मागणीसह ओबीसी विद्यार्थांसाठी ७२ वस्तीगृहे व २१,६०० विद्यार्थांसाठी स्वाधार योजना लागू झाली पाहीजे, सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना शंभर टक्के फी माफी योजना लागू करावी. महाज्योती संस्थेस एक हजार कोटी रुपयाचा निधी मिळाला पाहीजे, इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटीचा निधी मिळाला पाहीजे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे सर्व जिल्हयात स्वतंत्र कार्यालय, अधिकारी व ओबीसी भवन निर्माण झाले पाहिजे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाला तीस हजार कोटी रुपयाचा निधी मिळाला पाहीजे.तात्काळ शिक्षक भर्ती झाली पाहीजे. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहीजे आणि स्वामीनाथन आयोग लागू करा. इत्यादी मागण्यासाठी सदर मंडल यात्रा काढण्यात आली.
नागपूर,भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी, सावली ,मूल , पौभूर्णा, गोंडपिपरी,येनबोडी,बामणी, बल्लारपूर, राजूरा आणि गडचांदूर,लखमापूर,बाखर्डी,कवठाळा येथे या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी या यात्रेचा उद्देश स्पष्ट करून जनजागृती करण्यात आली.
मंडल यात्रेत यात्रेचे संयोजक उमेश कोराम, चंद्रपूर जिल्हा ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके, दिनानाथ वाघमारे, प्रशांत भेले, शंकर पाल, सुभाष उके, मंडल यात्रेचे जिल्हा स्वागताध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते आणि जिल्हा संयोजक विलास माथनकर सहभागी झाले होते.
या यात्रेचे चंद्रपूर जिल्ह्यात मोंटू पिल्लारे, भाऊराव राऊत, अभिषेक बद्दलवार, गणेश वासमवार,विवेक खुटेमाटे,अँड . अंजली साळवे, केतन जूनघरे, सुजीत कावळे, पवन राजूरकर ,प्रविण अहीरकर , न. प. चे माजी उपाध्यक्ष सचिन भोयर, न.प. उपाध्यक्ष शरद जोगी,बंडू वैरागडे,रवी शेंडे, हनुमान बेरड,शैलेश लोखंडे,किशोर आस्वले यांच्यासह विविध सामाजिक संघटना आणि हजारो नागरिक या यात्रेत सहभागी झाले.
6आगस्ट ला मंडल यात्रा पडोली (सायंकाळी 4.30वाजता), डॉ.आंबेडकर सभागृह चौक(4.40वा.), वडगाव फाटा (4.50वा.), जनता कॉलेज चौक(5 वा.), वरोरा नाका(5.05वा.),प्रियदर्शिनी चौक(5.15वा.),जटपुरा गेट आत(5.25वा.),छत्रपती शिवाजी महाराज चौक(5.35वा.),वीर बाबुराव शेडमाके स्मारक(5.40वा.),गांधी चौक-(5.50वा. ),डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर स्मारक(6वा.),बॅ. राजाभाऊ खोब्रागडे स्मारक(6.05वा.),जटपुरा गेट बाहेर(6.10), कवलराम चौक(6.15वा.),शिवसेना जिल्हा कार्यालय(6.20वा.),दीक्षाभूमी (6.25वा.),जनता कॉलेज चौक मार्गे मंडल यात्रा सी. डी. सी. सी. बँक कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृहात 6.35वा.पोहचेल व त्या ठिकाणी समारोपीय कार्यक्रम होईल.
मंडल यात्रेच्या स्वागतासाठी व समारोपीय कार्यक्रमासाठी मोठया संख्येनी विदयार्थी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडल यात्रा संयोजक प्रा.अनिल डहाके,ऍड. विलास माथनकर, स्वागत अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम सातपुते,सूर्यकांत खनके, हिराचंद बोरकुटे, डॉ. विवेक बांबोळे,सतीश मालेकर, ऍड. सागोरे,सुरेंद्र रायपुरे, वसंता वडस्कर, भाविक येरगुडे,खुशाल काळे, प्रलय म्हशाखेत्री यांनी केले.