राजुरा: सामाजिक बांधिलकी जोपासत वाचाल तर वाचाल हा मंत्र अंगी बाळगून सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत धानोरकर यांनी जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथे स्पर्धा परीक्षांची पुस्तके आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली.लक्ष्मीकांत धानोरकर हे परम पूज्य श्री. शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आहे. वाचनालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले.वाचन बऱ्याच जणांना कंटाळवाणे वाटते. मात्र, आजच्या या स्पर्धात्मक युगात जर टिकायचे असेल तर वाचन करणे ,ज्ञान वाढविणे गरजेचे आहे. याच उदात्त हेतूने लक्ष्मीकांत धानोरकर यांनी वाचनालयाला पुस्तके भेट दिली. यावेळी वरूर रोड येथील सरपंच गणपत पंधरे, अनिल डोंगरे,लक्ष्मीकांत धानोरकर, अविनाश राऊत,प्रकाश अल्बमकर, वसंतराव धानोरकर,राहुल धानोरकर, राकेश लांडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण चौधरी, स्वप्नील जीवतोडे,मेघा करमनकर,प्रज्वल बोरकर,सागर बोरकर,मयूर जानवे, समीक्षा मोडक, रुद्राक्षी शिंदे यासह आदी विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.