चामोर्शी;- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत मारोडा येथील ग्राम पंचायत उपसरपंच नंदाताई पुरुषोत्तम बोरकुटे, सदस्य शेषराव जुवांरे, , व जीवंनकला नागोसे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी ०७ सप्टेंबर २०२२ रोजी पारित केलेला आदेश नागपूर विभागाचे अपर आयुक्त यांनी कायम ठेवत अपील. फेटळल्यामुळे अखेर त्या तीन सदस्याचे सदस्यत्व रद्द झाल्याने पंचायत समिती वर्तुळात ऐकच खळबळ उडाली आहे.
पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मारोडा येथील एकनाथ चलाख यांनी महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५८ कलम १४(१)( ज -३) नुसार मारोडा ग्राम पंचायत सदस्य शेषराव नानाजी जुआरे यांच्या वडिलांनी मारोडा येथील शासकीय जमीन सर्व्हे क्र.९२ मधील ०.६४ हे. आर. तर दुसरे उपसरपंच सौ. नंदा पुरुषोत्तम बोरकुटे यांच्या सासऱ्यानी आणि त्यांच्या भावाने मारोडा येथील शासकीय जमीन सर्व्हे क्र.२०/१ मधील १.४६ हे. आर तर तिसरे सदस्य सौ. जीवनकला गजानन नागोसे यांच्ये सासरे यांनी मारोडा येथील सर्व्हे क्र.७५ मधील ०.२४ हे. आर. शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार गडचिरोली जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती त्यानुसार चामॉर्शी तहसीलदार यांनी मोका चौकशी करून अहवाल ०१ सप्टेंबर २०२१रोजी जिल्हाधिकारी यांना सादर केला होता त्यानुसार अहवाल ग्राह्य धरत २७ जुलै २०२२ रोजी आदेश पारीत करत तिन्ही सदस्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले होते .
तेव्हा या तिन्ही सदस्यांनी मा. अपर आयुक्त नागपूर यांचे न्यायालयात न्याय मागण्यासाठी अपील दाखल केले होते या प्रकरणातील अंतिम सुनावणी १० जुलै २०२३ रोजी घेण्यात आली त्यावेळी सर्वाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर या तिन्ही सदस्याचे कुटुंबीयांचे शासकीय जागेवर अतिक्रमण असल्याचे सिध्द झाल्याने त्यांचे अपील फेटाळण्यात आले असून गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी ०७ सप्टेंबर २०२२ रोजी पारीत केलेला आदेश कायम ठेवल्यामुळे शेषराव जुआरे,उपसरपंच नंदा बोरकुटे. व जीवनकला नागोसे या तिन्ही सदस्यांना अपात्र होण्याची पाळी आली असून अतिक्रमन करणे त्यांना अखेर भोवलेच!