चंद्रपूर: येथील मोहसीन भाई जवेरी, कनिष्ठ महाविद्यालय तुकुम, चंद्रपूर येथे रक्षाबंधन या दिनाचे औचित्य साधून वृक्षाला राखी बांधून वृक्ष रक्षाबंधन हा उपक्रम साजरा करण्यात आला. ऑक्सीजन शिवाय कोणताही माणूस या जगात जिवंत राहू शकत नाही. प्रत्येकाला जगण्यासाठी ऑक्सीजनची गरज असते. तसेच झाडापासून प्रत्येक मानवाला फळे,फुले,तसेच औषधी मिळत असतात.तसेच झाडांमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते.म्हणून प्रत्येकानी झाडावर प्रेम केले पाहिजे हाच उद्देश पुढे ठेवून महाविद्यालयात राखी वृक्षाबांधन साजरा करण्यात आला.यावेळी रोशनी खान,योगिता धांडे,प्रज्ञा लोखंडे,रुबिना शेख,सारिका काळे, शिक्षका इंदू तसेच विद्यार्थी उपस्थित होते.