चामोर्शी:- तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे कधी तापमानात वाढ घट होत असल्याने मलेरिया, डेंग्यू आदी आजाराचा प्रादुर्भाव काही प्रमाणात असतानाच आता ग्रामीण भागातील गनपुर रौ. गावात” स्क्रॅप टायफस” या नवीनच आजाराचा शिरकाव झाल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे
स्क्रॅप टायफस या नवीन जिवाणूंचा पहिला रुग्ण चामोर्शी तालुक्यातील कोंनसरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या गणपूर रै येथे आढळला असल्याने त्या रुग्णाला गडचिरोली व चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले होते उपचारानंतर तो रुग्ण गावी परत आला आहे त्यामुळे हा आजार पसरू नये यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे
स्क्रॅप टायफस या आजारात ताप, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, अंगावर काळे चट्टे, अंगावर अनेक ठिकाणी सूज, जिभेची चव जाणे, ही लक्षणे दिसून येतात.
उपाय:- स्क्रॅप टायफस वर अद्याप कोणतीही लस नाही त्यामुळे यावर उपाय सांगता येणार नाही, मात्र खबरदारी घेता येईल, म्हणजे संक्रमित व्यक्तिपासून दूर राहणे. आदी उपाय करावे लागेल.
गावामध्ये या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गावामध्ये उपाययोजना व ताप सर्व्हेक्षण करण्यासाठी २९ अगाष्ट रोजी आरोग्य उपकेंद्र गणपुर येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रफुल हलके यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधिकारी डॉ दुमपेट्टीवार, डॉ. चांदणी मिसार, डॉ. ज्योती मेश्राम, डॉ. प्रिया पिपरे, डॉ. कालिदास शहा. डॉ. सुरपाम, डॉ. मोहिनी रोकडे, , डॉ.पेद्दाला, पर्यवेक्षक, आरोग्य कर्मचारी, आदी आरोग्य विभागाचे ३६ , आरोग्य कर्मचाऱ्याचे पथक गावात दाखल झाले होते त्या पथकांनी संपूर्ण गावात भेटी देऊन तापाचे २८ रुग्ण शोधण्यात आले. दूषित कंटेनर १२३( डास, अळया आढळले) व दूषित आढळलेल्या कंटेनरमध्ये टेमिफास टाकण्यात आले. व ८७ कंटेनरला पालथी करण्यात आली. , नाल्यातील सांडपाण्यात बिटीआय पावडरची फवारणी संपूर्ण नाल्यामध्ये करण्यात आली तसेच कायमस्वरूपी दासेउत्पती स्थानात गप्पी मासे सोडण्यात आले., इंसेक्ट कलेक्टर मार्फत. गावातील डास घनता तपासण्यात आली., ग्रामपंचायत मध्ये सरपंच, उपसरपंच,सचिव व सदस्य गण यांची सभा घेऊन गावातील संपूर्ण नाल्या वाहती करणे साफ करणे, रस्त्यालगत व पानदन रस्त्यावरील गवतावर तणनाशक फवारणी करणे, म्यालेथियान पावडरची डस्टिंग करणे. कोरडा दिवस पळण्याविषय जनजागृती करणे पिण्याच्या पाण्यामध्ये नियमित कलोरीनेशन करणे व त्याची येटी टेस्ट करून रजिस्टर मध्ये नोंदी करणे इत्यादी बाबी विषय उपाय योजना करून मार्गदर्शन करून सर्वांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला.
या आजाराचा किटाणू गवत व गवताळ भागात वास्तव्यात असतो या किटानुच्या चाव्याने जीवही गमवावा लागू शकतो मात्र घाबरु नये , तालुक्यातील शेतकरी वर्गानी याची विशेष काळजी घेणे महत्वाचे असून कोणत्याही गावात वरील लक्षणे दिसून आल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात त्वरित संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
डॉ. प्रफुल हुलके, तालुका आरोग्य अधिकारी, चामोर्शी