कोरपना: तालुक्यातील गडचांदुर हे औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. शहरात माणिकगड सिमेंट कंपनी (अल्ट्राटेक) या कंपनीमुळे जड वाहनांना मोठे चलन मिळाली आहे. हे सगळं होत असताना देखील स्थानिक प्रशासन जणू झोपेत असल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील मुख्य चौकांपैकी माणिकगड चौक येथील पार्किंग समोर ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावरून चालत असताना नागरिकांना व स्थानिक दुकानदारांना रस्त्यावरील गिट्टी अर्थात लहान दगड यांचा मार सहन करावा लागत आहे. वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. खड्ड्याची डाकडुजी करून नागरिकांना दिलासा द्यावा .. बांधकाम विभाग व संबंधित विभागाने याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे…