ब्रम्हपूरी: ब्रम्हपूरी-आरमोरी रस्त्यावरील रेल्वे क्राॅसिंगवरील उड्डाणपुलाचे भुमीपुजन राज्याचे विरोधी पक्षनेता, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते आज दि. 3 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता, ब्रम्हपुरी-आरमोरी रस्त्यावरील रेल्वे फाटक च्या बाजुला असलेल्या मैदानात पार पडणार आहे.
ब्रम्हपूरी शहरातील ब्रम्हपूरी-आरमोरी रस्त्यावर रेल्वे क्राॅसिंग आहे. या रेल्वेच्या रुळावरून मोठ्या प्रमाणात प्रवासीगाड्या, सुपरफास्ट व मालगाड्या धावत असतात. त्यामुळे दिवसभरात अनेकदा रेल्वे फाटक बंद होत असते. यामुळे वाहतुकीस खोळंबा निर्माण होत असतो. याचा मोठा त्रास या रस्त्याने आवागमन करणाऱ्या प्रवाशांना होत असतो. बऱ्याचदा या मार्गावर रेल्वे फाटक बंद असल्यानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा तयार होत असतात.
सदर समस्येची गांभीर्याने दखल घेत राज्याचे विद्यमान विरोधीपक्षनेता विजय वडेट्टीवार हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री असतांना राज्याच्या विशेष अर्थसंकल्पातुन ब्रम्हपुरी -आरमोरी रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूलाच्या बांधकामासाठी 75 कोटी रुपये मंजूर करून घेतले. सदर काम मंजूर झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करीत राज्याचे विरोधीपक्षनेते, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले आहेत.