Homeगडचिरोलीअतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा गडचिरोली पोलीस दादालोरा...

अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने

गडचिरोली: जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पध्दतीने शेती करीत आहेत. त्यामुळे शेती मधुन प्राप्त होणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने त्यांच्या आर्थिक विकासास अडथळा निर्माण होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास अडचण निर्माण होत आहे. जिल्ह्यातील शेतकरी जिल्ह्याबाहेर पडून, पारंपरिक शेतीला बगल देत विविध क्लृप्त्यांचा वापर करीत अत्याधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जावून तेथील परिस्थीतीची, आधुनिक शेती व उपकरणांची पाहणी करतील व त्या ज्ञानाचा वापर करून पारंपरिक शेती पध्दतीत बदल करतील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील पोस्टे पेंढरी, कारवाफा, कटेझरी, ग्यारापत्ती, मुरुमगाव, कटेझरी, कोटगुल, कोरची, रेगडी, पोमकें सावरगाव, गोडलवाही, गड्डा (फु.), बेडगाव, मालेवाडा व पोटेगाव हद्दीतील एकुण ५० शेतकऱ्यांकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने आतापर्यंत एकूण आठव्या कृषीदर्शन सहलीचे व सन २०२३ मधील चौथ्या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

आतापर्यंत झालेल्या एकूण सात कृषी दर्शन सहल व अभ्यास दौन्यांमध्ये दुर्गम भागातील विविध उपविभागातून एकूण ३१० महिला व पुरुष शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या आठव्या सहलीमध्ये कुरखेडा, धानोरा, पेंढरी, गडचिरोली उपविभागातील पोस्टे / उपपोस्टे / पोमके हद्दीतील अतिदुर्गम भागातील ५० शेतकयांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या सहली दरम्यान सहभागी शेतकरी हे नागपूर, अकोला, शेगाव, जळगाव, अमरावती, अजीठा, राहुरी, नारायणपूर, देवगड, बडनेरा, वर्धा, वरोरा, भद्रावती जि. चंद्रपूर येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच विविध शेती प्रक्षेत्र यांना भेटी देणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील अकोला व राहुरी येथील कृषी विद्यापिठांना भेटी देणार असून, शेतीविषयक अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञान जाणून घेणार आहेत. यामुळे ते प्रगत तंत्रज्ञानाचे अनुभव आपल्या शेती व्यवसायामध्ये वापरून आपली आर्थिक उन्नती साधून जिवनमान उंचावतील त्यामुळे जिल्ह्यातील विकासात त्यांचे योगदान असणार आहे.

सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शनात आज ०४ सप्टेंबर २०२३ पासून १३ सप्टेंबर २०२३ रोजी पर्यंत एकूण १० दिवस आयोजीत करण्यात आला असून, या आठव्या कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा कार्यक्रमास मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल तसेच आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी प्रफुल पोरेड्डीवार व सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुधाकर गौरकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय अधिकारी सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!