गडचांदुर -भारताचे माजी राष्ट्रपती तत्त्वज्ञानाचे अभ्यासक मा.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला . महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रा . ईजाज शेख यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक बनत विविधांगी भूमिकाने स्वयंशासन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्राचार्य पद प्रतीक्षा चिंचोलकर, उप प्राचार्य शेखर कोपरे गणित माधुरी बावणे ,मयुरी कोल्हे राज्यशास्त्र, आकांक्षा लसंते जनरल स्टडीज , श्रद्धा निकोडे भूगोल विषयाचे अध्यापन केले. समीक्षा पिंपळशेंडे हिने लीपिकाची भूमिका उत्तमरीत्या पार पाडली. स्वयंशासन कार्यक्रमानंतर शिक्षक दिन कार्यक्रम घेण्यात आला. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माला अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .प्रतीक्षा चिंचोळकर , आकांक्षा लसंते, साक्षी डाखरे , तानाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील गुरुचे महत्व विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. गुरु शिवाय जीवनाला योग्य आकार प्राप्त होत नाही , ज्ञानाच्या कक्षा रुंदावत जीवन उज्वल करण्याकरिता गुरुची भूमिका महत्त्वपूर्ण असते.म्हणून प्राचीन काळापासून आजपर्यंत गुरूला प्रचंड मान आहे. तंत्रज्ञानात कितीही बदल झाला असला फोरजी, फाईवजी पर्यंत झेप घेतली असली तरी मात्र गुरुजीची बरोबरी कोणीही करू शकत नाही. म्हणून गुरुचे स्थान वंदनीय आहे असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी वैष्णवी क्षीरसागर यांनी केले व आभार धनश्री चतुरकर हिने मानले .