चंद्रपूर – रक्षाबंधन हा भावा बहिणीचा सण असला तरी इतरांनाही ह्या राखीच्या बंधनात बांधून आदरयुक्त नाते व राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करता येणारा, राष्ट्रीयत्व जोपासणारा सण म्हणून साजरा होतो.
विकलांग सेवा संस्थेद्वारा शिवभोजन लाभार्थ्यांना ओवाळून राख्या बांधण्यात आल्या व त्यांना ओवाळणीत राष्ट्रीय कर्तव्य म्हणून भारत समृद्धी व सक्षमतेसाठी प्रत्येकाने मतदान हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता श्री नितीन मुरल राव, देवराव कोंडेकर राजश्री शिंदे, सीमा दुपारे, रिया सोनुले वैष्णवी कोरडे पूजा चहारे ठलाल ह्यांनी सहयोग दिला.