चामोर्षि: कुमार रोशन कोहळे ग्रा.पं. सदस्य मारोडा तथा शिवकल्याण युथ मल्टीपर्पज डेव्हलपमेंट असोसिएशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गट ग्रा.पं. मारोडा अंतर्गत येत असलेल्या सर्व गावातील विद्यार्थ्यांकरिता युवक- युवती तसेच महिला व पुरुषांकरिता सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी तसेच गड ग्रामपंचायत मारोडा मधील अति संवेदनशील गावातील युवक स्पर्धेच्या काळात मागे राहू नयेत या उद्देशाने या स्पर्धेचा आयोजन करण्यात आला होता.
ही स्पर्धा दिनांक 27 ऑगस्ट 2023 ला पार पडली या स्पर्धेमध्ये 4 गटांमध्ये एकूण 194 युवक -युवतींनी भाग घेतला होता. या बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये अमन भाऊ साखरे (आम आदमी पार्टी तालुकाध्यक्ष चामोर्शी) यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना शिल्ड वाटप करण्यात आले.
अ गटामध्ये नागसेन जनबंधू (प्रथम )धनश्री सुरजागडे (द्वितीय) तर श्वेता मोहुर्ले आणि सारांश चलाख (तृतीय )क्रमांक पटकविला.
ब गटामध्ये साहिल तुंबळे (प्रथम ),तेजल चौधरी (द्वितीय ),तर लक्ष्मी सोमनकर, स्नेहल गायकवाड , ऐश्वर्या नैताम राज पेंदोरकर व समीक्षा वाळके यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले.
क गटामध्ये धनंजय सोमनकर (प्रथम ),सानिका गोडबोले (द्वितीय),तर अर्पण येलमुले (तृतीय )क्रमांक पटकावला.
ड गटामध्ये अभय कुकडे( प्रथम ),अमित चीचघरे (द्वितीय) तर रितिक उंदीरवाडे ( तृतीय), क्रमांक पटकाविला.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक भाषण करत असताना शिवकल्याण युथ मल्टीपर्पज डेव्ह. असो. संस्थेचे अध्यक्ष अनुप भाऊ कोहळे यांनी खेड्यावरील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ही बेताची असल्यामुळे खूप अडचणीत विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण कराव्या लागतो म्हणून या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अति संवेदनशील गावातील होतकरू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आमची संस्था केली अशी ग्वाही त्यांनी दिली.
अध्यक्षीय भाषण करत असताना माननीय शेषराव भाऊ कोहळे उपसरपंच ग्रा.पं.सोनापूर यांनी म्हटले की, सोनापूर मध्ये मुलांना स्पर्धा परीक्षेची ओढ लागावी .म्हणून आम्ही सार्वजनिक देणगीच्या माध्यमातून वाचनालयाची निर्मिती केली आणि आता प्रत्येक वर्षी सोनापूर येथील युवक- युवती जिद्द,चिकाटी व मेहनतीने नोकरी प्राप्त करत आहेत. हा स्तुत्य उपक्रम आपण सर्वांच्या मदतीने मारोडा ग्रामपंचायत मध्ये उभारू आणि स्पर्धा परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करू अशी आश्वासन दिले.
या कार्यक्रमांमध्ये सत्कारमूर्ती म्हणून एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेले भूषण भाऊ कारडे (पीएसआय) व उच्च श्रेणी मध्ये (कृषी उपसंचालक) पदावर प्राविण्य मिळवणारे प्रफुल भाऊ गव्हारे यांनी विद्यार्थ्यांना ,गावातील नागरिकांना स्पर्धेबद्दल मार्गदर्शन केले. स्पर्धेमध्ये आपली परिस्थिती कशी आहे याच्याकडे लक्ष न देता आपल्या मुलांना नेहमी प्रोत्साहित केले पाहिजे.जिद्द चिकाटी मनात ठेवून मेहनत घेतल्यास यश नक्की संपादन होते असे मत सत्कारमूर्तींनी व्यक्त केले.
या कार्यक्रमांमध्ये उपस्थित अनिल झुरे (सरपंच), बोरकर साहेब (ग्रामसेवक )शेषराव भाऊ कोहळे उपसरपंच ग्रा.पं. सोनापूर , दादाजी पा. कोहळे( प्र.ना.) विश्वनाथ पा. लोळे ( प्र.ना.)प्रफुल गव्हारे (सत्कारमूर्ती) भूषण कारडे (सत्कारमूर्ती ), नानाजी पा.कुळमेथे,उमाकांत पा.दुर्गे ,नागुलवार सर, पेंदाम सर ,दुर्गे सर, गिरीधर मोहुर्ले, एकनाथ पा .कावळे (पो.पा.) मारोडा, दिवाकर कावळे ,अमन साखरे,प्रदीप बोरकुटे,सुमित चीचघरे,मुकेश जनबंधू, लेखाजी नैताम ,रजनीकांत सातपुते, चंद्रशेखर लोळे, चुधरी टीचर, सोमेश्वर वैरागडे, इत्यादी उपस्थित होते.