राजुरा: तालुक्यातील पाचगाव या गावातील कैकाडी गुडा येथील रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्ता चिखलमय झालेला आहे. पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावरून दुचाकी चालवणे अवघड झाले आहे. अपघाताला आमंत्रण देणे असे काही चित्र या ठिकाणी आहे. गावकऱ्यांना पायी चालताना देखील तोल सांभाळावा लागतो आहे. एकीकडे देशात हजारो कोटी रुपये खर्चून महामार्ग तयार होत आहेत, मात्र गाव हा देशाचा नकाशा असून अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसते हे खेदजनक आहे. विकासाचं मॉडेल उभारताना देशातील ग्रामीण भाग केंद्रस्थानी असणे गरजेचे वाटते. सदर रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ सुरज बोबडे यांनी व्यक्त केली आहे.