गडचिरोली: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२३ मध्ये सहाय्यक आयुक्त या पदासाठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून गडचिरोली येथील शुभम येलेश्वर कोमरेवार याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. ठाण्याचा जयेश जगनाथ बालकाटे द्वितीय तर मुंबई चा सागर विठ्ठल शिंदे तृतीय आला.
महापोर्टल द्वारे घेण्यात आलेल्या २०१९ च्या परीक्षेत दहावा क्रमांक घेऊन सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी या पदी निवड झाली. गडचिरोली सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयात कार्यरत होते.
सध्या शुभम येलेश्वर कोमरेवार सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त कार्यालय हडपसर पूणे येथे कार्यरत आहे. आपल्या स्वजिल्ह्यात गडचिरोली येथे ही या पदावर उल्लेखनीय कार्य केलेले होते. शुभम चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत धानोरा तालुक्यात इरूपटोला येथे झाले. गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी शाळेत त्याचे माध्यमिक शिक्षण झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण – मत्स्य व पशुधन विद्यापीठ नागपूर येथे झाले.
इयत्ता दहावी नंतर त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ध्येय निश्चित केले होते. मात्र त्यासाठी लागणारी तयारी, क्लासेस हे गडचिरोलीत उपलब्ध नव्हते. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षेसाठी करावी लागणारी तयारी याचा कोणताही अंदाज आपल्याला नव्हता, असे शुभम सांगतो. राज्यात पहिला आलेला शुभम येलेश्वर कोमरेवार हा मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या गावचा रहिवाशी आहे. शुभमचे वडील येलेश्वर कोमरेवार सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तर आई सौ. रत्नप्रभा येलेश्वर कोमरेवार पदवीधर शिक्षिका आहे. लहानपणापासून सरकारी अधिकारी व्हायचे हे शुभमचे ध्येय, चिकाटी व मेहनत आणि त्याला त्याच्या आई-वडिलांनी साथ दिली. घरचे वातावरण शैक्षणिक असल्याने अधिकारी होण्याचे बाळकडू लहानपणापासून मिळाले. या यशाचे श्रेय आई वडीलांच्या पुण्याई ला दिले.
कमी वयात दैदीप्यमान यश संपादन केल्याबद्दल शुभम चे सर्वत्र कौतुक होत आहे .