चंद्रपूर:गोंडपिपरी बाजार समितीच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी महाआरोग्य शिबीराचा कार्यक्रम घेण्यात येत आहे.या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी,राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर जिल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे फोटो टाकण्यात आले आहे.17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरंेद्र मोदी यांचा वाढदिवस आहे.यामुळे यानिमीत्ताने संधी साधून भाजपने आयोजीत केलेले महाआरोग्य शिबीर हे केवळ नावापूरती असून यातून त्यांनी आपल्या पक्षीय प्रचार केला आहे.
नुकतीच गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक पार पडली.तब्बल बत्तीस वर्षानंतर पहिल्यांदाच भाजपने आपली सत्ता बसविली.इंद्रपाल धुडसे हे सभापतीपदी रूजू झाले.त्यांच्या नेतृत्वात 17 सप्टेेंबर रोजी स्थानिक कला वाणीज्य महाविद्यालयात महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी हजारोच्या संख्यंेत महागळी डिजीटल पाम्पलेट व पत्रिका छापण्यात आल्या व त्याचे तालुकाभर वितरणही पार पडले.या पत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर जिल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सभापती इंद्रपाल धुडसे व उपसभापती स्वप्नील अनमुलवार यांचेही फोटो टाकण्यात आले.दरम्यान बाजार समितीचे संचालक अशोक रेचनकर यांनी सत्ताधाÚयांच्या या भुमिकेवर जोरदार प्रहार केला आहे.हा महाआरोग्य शिबीराचा कार्यक्रम आहे कि,भाजपचा प्रचाराच्या माध्यम असे म्हणत रेचनकर यांनी बाजार समितीच्या 31 आॅगष्ट 2023 रोजीच्या सभेचा हवाला दिला.या सभेत बाजार समितीमार्फत महाआरोग्य शिबीर घेण्यासंदर्भात विषय क्रमांक 1 वर चर्चा झाली.त्यानुसार सदर शिबीरादरम्यान राजकीय बाब उपस्थित होणार नाही.यासंदर्भात ठराव मांडला.याला सर्व संचालकांनी मंजुरी दिली.एकमताने हा ठराव पारित झाला असंतांना नियोजीत कार्यक्रमाच्या पत्रिका वाटपानंतर आता यातील वाद चव्हाटयावर आला आहे.बाजार समितीशी संबधीत सहकार,पणन मं़़ंत्री सह स्थानिक आमदार सुभाष धोटे यांचा सुध्दा प्रोटोकाल नुसार फोटो टाकण्याची गरज होती.पण राजकीय भावनेतून स्वार्थापोटी बाजार समितीने ठराविक त्यांच्याच नेत्यांचे फोटो व नांव टाकून प्रोटोकाल आणी बाजार समितीच्या ठरावाची खिल्ली उडविली आहे.
या महाआरोग्य शिबीरासाठी बाजार समितीने घेतलेल्या ठरावानुसार केवळ 1 लाख रूपयाच्या खर्चाला मंजूरी दिली.याउपर रक्कमेचा खर्च होणार नाही याबाबत सुचविले.असे असंतांनाही या सामाजिक उपक्रमाला राजकीय कार्यक्रमाचा रंग देण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला आहे.दरम्यान महाआरोग्य शिबीरासाठी काॅग्रेस समर्थीत बाजार समितीच्या संचालकांनी आमचा विरोध नाही असे स्पष्ट केले आहे.पण शिबीराच्या नावाखाली राजकीय पक्षाच्या प्रचार होत असल्याच्या प्रकाराचा संचालक अशोक रेचनकर,देविदास सातपूते,ंसंतोष बंडावार,निलेश ंसंगमवार,नारायण वाग्दरकर,प्रेमिला चनेकार यांनी कडाडून विरोध केला आहे.