राजुरा: येथील वन उद्यानात विद्यार्थ्याना निसर्ग आणि मानव या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.हा नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूल वरूर रोड यांनी राबविला.
प्रत्येकाला जगण्यासाठी ऑक्सीजनची गरज असते. तसेच झाडापासून प्रत्येक मानवाला फळे,फुले,तसेच औषधी मिळत असतात.तसेच झाडांमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते.
तसेच निसर्गाचे नुकसान करण्याचे अनेक हत्यारे माणसाकडे आहेत, परंतु निसर्ग टिकला नाही तर माणूसही टिकणार नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. खरे तर माणूस अजूनही माणूस बनायचा आहे. माणसाने निसर्गावर प्रेम केले तर निसर्गाकडूनही प्रेमच मिळेल असे
शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि तक्षशिला बहुउद्देशीय अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थाचे अध्यक्ष प्रा. उत्कर्ष गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला शिक्षिका अश्विनी तेलंग, श्रद्धा गेडाम, कोमल वानखेडे आणि विद्यार्थी उपस्थित होते.