गडचांदूर- प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदुर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने वकृत्व स्पर्धा,पोस्टर्स स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती. यावेळी अध्यक्षीय भाषणात भारतीय स्वतंत्र लढ्याच्या बरोबरीने मराठवाडा मुक्ती संग्राम हा लढा लढला गेला असून हा स्वातंत्र्यसंग्राम फक्त मराठवाडा विभागापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात पार पाडायला हवा.हैदराबाद मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांच्या
कार्याचे स्मरण होणे गरजेचे आहे. त्यांच्या बलिदाना प्रति आपण सर्व कृतज्ञ आहोत त्याची जाणीव सर्व विद्यार्थ्यांना व्हावी असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी केले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.एजाज शेख प्रा. राहुल ठोंबरे,प्रा. मनीषा मरसकोल्हे प्रा.सचिन पवार,प्रा रोशनी खाते, प्रा.सचिन धनवलकर ,प्रा. श्रीकांत घोरपडे व प्रतीक मून,गजानन भारती उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राहुल ठोंबरे यांनी तर संचालन माधुरी बावणे व आभार विद्या दुर्गे यांनी केले.