सततच्या पावसामुळे आणि गोसीखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे ब्रम्हपुरी आणि सावली तसेच लगतच्या भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील सीमा वरती भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, सोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी असे निर्देश राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.
मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पुरामुळे धान,कापूस व सोयाबीन ही पिके पाण्याखाली आली असून पूर्णता उध्वस्त झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यात ब्रह्मपुरी तालुक्यातील कोलारी, अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव भो, चिखलगाव, चिंचोली, सावलगाव, सोनेगाव, बोढेगाव, बेटाळा, रणमोचन, खरकाडा, निलज, बरडकिन्ही, चिचगाव, आवळगाव, मुडझा, हळदा, बोडधा, डोर्ली
नदीकाठालगतच्या शेतकऱ्यांना याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. तर सावली तालुक्यातील जिबगाव , उसेगाव ,हरंबा, कडोली, करोली आकापूर गेवरा भूत गेवरा खुर्द कसरगाव विहीरगाव बोरमाळा डोंगरगाव, निफद्रा, अंतरगाव ,निमगाव, चिचबोडी थेरगाव, बेलगाव, चेक विरखल, दाबगाव , वाघोली मोखाडा, विचोरा, सामदा, सोलापूर, पेठगाव भानसी कडोली, लोंढोली, साखरी, सिरसी, पारडी, रुद्रापूर पेटगाव माल आधी गावालगाच्या शेत शिवारात गोसेखुर्द धरणाचे पाणी शिरल्याने प्रचंड प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.
याची माहिती मिळताच राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी, सावली तसेच लगतच्या गडचिरोली व भंडारा जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.