बल्लारपूर: राष्ट्रीय ओबीसी महासंघव ओबीसी समन्वय समिती व सर्व जातीय संघटना यांनी ओबीसी समुदायाच्या न्याय हक्कांसाठी मागील 15 दिवसापासून आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून बल्लारपूर तालुक्यात तहसील कार्यालय जवळ नगर परिषद चौक बल्लारपूर समोरील मंडपात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. गणपती मोरे व विवेक खुटेमाटे याच्या नैत्वुत्वात एक दिवसिय लाक्षणिक उपोषण करीता बसले असून त्यांना सर्व ओबीसी बांधवांनी पाठींबा दिला व उपस्थिती दर्शविली.
ओबीसीतुन मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, महाराष्ट्र सरकारने बिहार राज्याच्या धरतीवर जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी विध्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात मुला मुलींकरीता स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरू करण्यात यावी यासह अनेक मागण्याचे निवेदन बल्लारपूर चे तहसिलदार यांच्या मार्फत शासनाला देण्यात आले. या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण होणाऱ्या आंदोलन स्थळी
राष्ट्रीय ओबीसी महासंघ बल्लारपूर तालुका अध्यक्ष गणपती मोरे ,ओबीसी समन्वय समिती बल्लारपूर तालुका अध्यक्ष विवेक खुटेमाटे, सुधीर कोरडे,राजेश बटे, केशव थीपे, शंकर काळे,रणजित धोटे, भास्कर वडस्कर ,सूर्यकांत साळवे,घनशाम भाऊ मुलचंदाणी, करीम भाई , ॲड मेघा भाले, राजू भाऊ झोडे,बादल भाऊ उराडे,देवेंद्र आर्या,भास्कर भाऊ माकोडे,गोविंदा पोडे,सुभाष भाऊ ताजने , पांडुरंग जरीले,योगराज बोबडे,रेखा रामटेके,नरेंद्र कौरासे,नितीन वरारकर, अनिल मोरे ,योगेश पोतराजे , शुभांगी तिडके ,वसंतराव खेडेकर, किसन पोडे ,गणेश पुलगमवार, लक्षण कणकुटला,संतोष बडकेलवार, एड मेघा भाले ममता चंदेल, विजय भोयर,शंकर भोयर, गोविंदा उपरे,अधिक ओबीसी समाज बांधव सहभागी झाले होते. तब्बल बारा दिवस रविंद्र टोंगे यांचे चंद्रपूर येथे उपोषण सुरू होते याची दखल शासनाने घेतली नाही आणि आता संपुर्ण जिल्ह्यात ओबीसींचे आंदोलन तीव्र होत असून येणाऱ्या 30 सप्टेंबर ला संपूर्ण चंद्रपूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.