राजुरा:मराठ्यांचा ओबीसीत समावेश करू नये यासाठी रविंद्र टोंगे यांचे चंद्रपुर येथे मागील 12 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन चालू आहे. त्यांची प्रकृती खुप खालावली आहे. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तिथेही त्यांचे आंदोलन चालूच आहे. त्यांच्या या आंदोलनाला समर्थन म्हणून प्रत्येक तालुक्यात एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. यात राजुरा येथे भूषण फुसे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, 72 वसतिगृह, स्वाधार योजना, परदेशी शिष्यवृत्ती देण्यात यावी व इतर अनेक मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्या.
आर्मीमध्ये निवड झालेल्या लोकेश वडस्कर, अभिजीत मोहुर्ले व प्रतीक आत्राम यांचे अण्णाभाऊ साठे लिखित साहित्यसम्राट *फकीरा कादंबरी* व पुष्पगुच्छ भेट देऊन अभिनंदन करण्यात आले.
एक दिवसीय लाक्षणिक उपोषण यशस्वी करण्यासाठी भूषण फुसे, दिनेश पारखी, अमोल राऊत, संतोष कुळमेथे, बादल बेले, धनंजय बोरडे, दिलीप गिरसावळे, जगदीश पिंगे, सुभाष हजारे, ज्योतीताई नळे, मिनाक्षिताई मून, अनुसयाताई, सूरज गव्हाणे, उत्पल गोरे, कपिल इद्दे, मारोती कुरवटकर, आसिफ, बाबूराव मडावी, मधुकर कोटनाके, लखन अडबाले, अभिलाष परचाके, आकाश गेडाम, मनोज आत्राम, घनश्याम मेश्राम यांची प्रमुख भूमिका होती.