गडचांदुर: शहरात ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात साजरा झा कार्यक्रमाच्या वेळी जामा मस्जिद, रजा मस्जिद चे इमाम हसनैन रजा यांच्या उपस्थितीत ईद-ए-मिलाद जुलूस संपन्न झाला सदर जुलूस मधे मदिना मस्जिद ते रजा मस्जिद व गौसिया मस्जिद ते रजा मस्जिद येथे नाथपठण करत दोन्ही मज्जिदचे जल्लोष आणण्यात आले व रजा मज्जिद गांधी चौक येथे जुलूस चे स्वरूप मोठे झाले सदर जुलूस गांधी चौक ते मानिकगड गेट, माणिकगड गेट ते पेट्रोल पंप चौक, पेट्रोल पंप चौक ते शेडमाके चौक, शेडमाके चौक ते महात्मा फुले चौक ते गांधी चौक अशी ही कार्यक्रमाची रूपरेषा होती सदर कार्यक्रमांमध्ये नागपूरचे कवाल यासीन ताजी यांची मटका पार्टीने जुलूस मध्ये विविध प्रकारचे नात, कवाली इत्यादीचे पठण केले व सदर कार्यक्रमांमध्ये मुस्लिम बांधवांनी नातचे पठण केले व सदर कार्यक्रमांमध्ये विविध ठिकाणी खीर पुरी, फळे, नाश्ता इत्यादी चे आयोजन समाजबांधव कडून करण्यात आले. व सदर जुलूस च्या मागे नगर परिषद चे कर्मचारी व कचरा गोळा करण्याकरिता गाडी चा आयोजन देखील करण्यात आला होता याबद्दल नगरपरिषद गडचांदूर यांचे तमाम मुस्लिम बांधवांकडून आभार देखील व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचांदुर पोलीस बल यांनी देखील अथक परिश्रम घेतले व सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे देखील आभार कव्वाल यासीन ताजी व रजा मस्जिद कमिटी यांनी व्यक्त केले.