जिवती (ता. प्र.) : जिवती तालुका अंतर्गत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या,जनतेच्या सेवेसाठी तहसीलदार तत्पर पहिल्यांदाच पाव्हयास मिळतो आहे. एरवी साहेबांचा मोबाईल क्रमांक मागितला असता सहजा सहजी मिळत नसतं, नंबर मिळतो तो फक्त नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या पर्यंत मर्यादीत, मग सामान्य जनतेच काय?त्यांना मोबाईल क्रमांक असून सुद्धा,माझ्याकडे नाही सांगितल्या जात, त्यात तालुका अंतर्गत येणाऱ्या सर्व नागरिकांच्या अडचणी दूर व्हावा म्हणून नव्याने रुजू झालेले तहसीलदार सुटी, दौऱ्यावर असताना भेटीसाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी दूर व्हावा.
याची काळजी घेणारादेखील अधिकारी असू शकतो,याचे फॉर उत्तम उदाहरण प्रथमतः म्हणजे जिवती तालुक्याचे पाहिले तहसीलदार अविनाश शेंबटवाड आहेत.
त्यांनी आपला मोबाईल क्रमांक जनतेसाठी सार्वजनिक करून दिला आहे.
शेंबटवाड यांनी जुलै २०२३ मध्ये तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर,आपल्याकडे प्रश्न व अडचणी घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी आपला मोबाईल क्रमांक सार्वजनिक करून टाकला आहे.’आपला तालुका हा अती दुर्गम व डोंगराळ भाग आहे.गावातून ,पाड्यातून तालुका मुख्यालयी येण्यासाठी येण्यासाठी वाहतुक साधनांची आवश्यक सोय नाही.तसेच बहुतांश गावात मोबाई नेटवर्क व इंटरनेटची सुविधा नसल्याने नागरिकांना बार बार मुख्यालयी येण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत.परंतु माझ्यापर्यंत येण्यासाठी कुठल्याही दलालाची अथवा मध्यस्थितीची गरज नाही.तुम्ही कोणत्याही वेळी फोन अथवा मॅसेज करून तुमच्या कामासमंधी किंवा अडचणीसंबंधी कळवू शकता,असे तहसीलदारांनी तहसील कार्यालयात एक फलक लावून केले आहे.
सध्या पावसाचे दिवस चालू आहेत. तरी अत्यावश्यक दुर्गम भागातील गावात होणाऱ्या नुकसानीबाबत तुम्ही मला ७०५७७३८१७७ या मोबाईल क्रमांकावर प्रत्यक्ष फोन किंवा व्हॉटसॲप , WhatsApp मॅसेज करून कळवू शकता. तुम्हाला होणाऱ्या अडचणी व त्रास कमी होईल,यातच आमचा आनंद आहे.असेही त्या फलकाता नमूद करण्यात आले आहे.
जनतेच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील,
जनतेसाठीच आपण ईथे बसलो आहोत.याची काळजी प्रत्येकानी ठेवली पाहिजे.नागरिकांच्या कामात हगर्जीपणा नको,आणि ते मी कदापि खपून घेणार नाही,असा इशाराही शेंबटवाड यांनी कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यांना स्कत्त सूचना दिल्या आहेत.
कोट : सामाजिक संदेश देणारे चित्रपटाचे लेखन
जिवती येथील तहसीलदार शेंबटवाड यांनी लेखन व दिग्दर्शन केलेली ‘ चुनाव ही शोर्ट फिल्म(लघुपट)महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाली आहे.
तसेच स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आणि त्यांचे प्रश्न या ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या यथावकाश या सिनेमाचेही लेखन व दिग्दर्शन त्यांनी केले आहे.