चंद्रपूर – वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड परायी जाणे रे, पर दुःखे उपकार करे तो ये, मन अभिमान न आणे रे. या महात्मा गांधीच्या सामुदायिक प्रार्थनेने प्रारंभ झालेल्या महात्मा गांधी जयंती निमित्य होणाऱ्या सप्ताहातील दुसऱ्या दिवशी ०३ ऑक्टोबर २०२३ ला सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथे समाजकार्याच्या पद्धतीतील समुदाय संघटन या पद्धतीला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याकरीता मा.ॲड . पारोमिता गोस्वामी यांचे ‘ महात्मा गांधी एक कुशल समुदाय संघटक ‘ या विषयावर महाविद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले.
यावेळी महात्मा गांधी यांचा दक्षिण आफ्रिका पासून सुरु झालेला प्रवास , त्यातील विविध टप्पे, त्यात त्यांनी केलेले संघटन , त्यासाठी केलेले विविध प्रयोग , सत्याचे प्रयोग , सत्याग्रह विविध पैलू ॲड . पारोमिता गोस्वामी यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत उलगडले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.प्राचार्य डॉ सुनिल साकुरे यांनी भूषवले. यावेळी मंचावर उपप्राचार्य प्रा. नरेंद्र टिकले , कार्यक्रमाचे समनव्यक डॉ जयश्री कापसे, डॉ देवेंद्र बोरकुटे , विद्यार्थी प्रतिनीधि स्वप्निल मेश्राम , निखिल भडके उपस्थित होते. साक्षी अतकरे हिने सामुदायिक प्रार्थना,संचालन प्रेम जरपोतदार, पाहुण्यांचा परिचय स्वप्नील मेश्राम , आभार अनुराग चांदेकर यांनी केले . यावेळी सुमित काकडे याने महात्मा गांधींवर मार्मिक कविता सादर केली . प्रवेशद्वारावर महात्मा गांधीना अभिवादनपर रांगोळी निलिमा कारमेंगे मानसी मसके या विद्यार्थ्यांनी काढली. यावेळी विद्यार्थ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.