राजुरा, दि. ०९ आक्टोंबर.
शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे, हे नगरपरिषदचे प्राथमिक कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, दिवाबत्ती, त्यांच्या घरातील केरकचरा रोज संकलित करणे तसेच नालेस्वच्छता, गडर लाइनची योग्य व्यवस्था असावी, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने सदैव तत्पर असावे. प्रत्येक प्रभागात नागरिक अनेक समस्यांशी संघर्ष करीत आहेत, या सर्व समस्यांना प्राधान्याने घेऊन त्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी तातडीने योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी घेऊन भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात आज भाजपा राजुरा शहराच्या शिष्टमंडळाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव यांची भेट घेत निवेदन दिले.
यावेळी तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे, सुरेश रागीट, माजी नगरसेविका उज्ज्वलाताई जयपुरकर, सौ. प्रितीताई रेकलवार, शितलताई वाटेकर, अजय उमरे, दिलीप गिरसावळे, दिपक झाडे आदिंची उपस्थिती होती.