गडचांदूर-राज्यात होणाऱ्या आगामी पोलीस भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता पर तीन दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले.मार्गदर्शन पर शिबीर दि.17 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे.सदर शिबीराचे उदघाटन मा.वैभव लोणारे सर ,मा.अरविंद मुसने यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. वैभव लोणारे सर मा.नागेश सर व महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर धोटे यांची उपस्थिती होती.मा.वैभव लोणारे यांनी मार्गदर्शन शिबिरात पोलीस भरतीचा अर्ज कसा भरावा त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात त्याची छाननी कशी होते याची माहिती दिली. तर मा.नागेश वाट यांनी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षेसाठी कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करावा किती गुणांचे प्रश्न असतात त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम व कमी वेळात पेपर कसा सोडवला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर धोटे यांनी यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अभ्यासक्रम व वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अरविंद सर यांनी विद्यार्थ्यांनी सदर होणाऱ्या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचा लाभ अधिक प्रमाणात घ्यावा व यामधून आपले ध्येय गाठावे याविषयी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.एजाज शेख,प्रा.राहुल ठोंबरे,प्रा.मनीषा मरस्कोले,प्रा.अमोल जाधव,प्रा.श्रीकांत घोरपडे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन प्रतीक्षा चिंचोलकर,प्रास्ताविक दीपा येरगुडे तर आभार मयुरी कोल्हे हिने मानले.