कोरपना : तालुक्यातील शेतकऱ्यांनसाठी अदामा इंडिया प्रा.ली.कंपनी तर्फे मिरची पीक व्यवस्थापन चर्चासत्र कोरपना येथे आयोजित करण्यात आले होते या चर्चा सत्रात कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.. या चर्चा सत्राला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन अदामा कंपनी चे असिस्टंट जनरल मॅनेजर (मार्केटिंग) मुकेश कुमार ,रिजनल मॅनेजर विवेक नाखले मार्केटिंग डेवलपमेंट ऑफिसर देविदास आढावे होते.त्यांनी मीरची पीक व्यवस्थापना बद्दल महत्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांना दिली तसेच मिरची पिकाच्या लागवडीपासुन तर उत्पादनापर्यंत घ्यावयाची काळजी या बद्दलही मार्गदर्शन केले .या प्रसंगी अदामा कंपनी चे अधिकृत विक्रेते रवी कृषी केंद्र चे संचालक भालचंद्र बोडखे, व्यंकटेश्वरा एजन्सीज चे व्यंकटेश्वरलु पेनुबाकुला,श्री गणेश कृषी केंद्र चे अनिल ठाकरे, श्री साईकृपा कृषी केंद्र चे पुंडलिक गिरसावळे,श्री साई ऍग्रो ट्रेडर्स चे मनीष पिंपळशेंडे ,ओम साईराम ऍग्रो सेंटर चे रमेश बुर्रेवार, तिरुमला ऍग्रो एजन्सी चे श्रीनिवास बलसु,विवेक कृषी केंद्र चे विवेक काकडे,पंकज गिरसावळे व सर्व कोरपना कृषी विक्रेते तथा अदामा कंपनी चे टेरीटरी मॅनेजर सतीश जाधव ,समीर मांडवकर,,मंगेश आत्राम,शुभम परसावार, स्वप्निल भालेराव,सौरभ खामनकर आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले तसेच अदामा कंपनीच्या उत्पादनाबद्दल शेतकऱ्यांनी विश्वास दाखविला.