गडचिरोली :– चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन केली गडचिरोली जिल्ह्य़ातील अवकाळी पावसाने व वन्यजीव प्राण्यांच्यामुळे नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी सवांद साधून केले सांत्वन. गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना अवगत केली गडचिरोली जिल्ह्य़ातील गंभीर परिस्थिती, विविध प्रश्नांवर केली चर्चा. गडचिरोली, चंद्रपूर जिल्हात दुष्काळ जाहीर करून अतिशिघ्र नुकसानीचे पंचनामे करावे, शेतकऱ्यांना तातडीने आर्थीक मदत द्यावी, सुरजागड कंपनी च्या वाहतूकीने होणारे नुकसान तसेच अपघात यावर नियंत्रण आनावे, कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन आरोग्य सेवा सुरळीत करावी, झेंडेपार येथील सुनावणी पून्हा करण्यात यावी, मेडीगट्टा धरणाने शेतकऱ्यांचे व अन्य नागरिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गडचिरोली जिल्ह्य़ाचे पालकमंत्री हे जिल्हासाठी पुरेसा वेळ देत नसल्याने त्यांना बदलण्यात यावे अशा विविध मुद्दय़ांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, प्र. महासचिव नामदेवराव किरसान, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रभाकर वासेकर, विश्वजित कोवासे, सतीश विधाते यासह गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.