वरोरा: 3 जानेवारी ,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आणि शेवंती प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले. शेवंतीची झाडे विद्यार्थ्यांनी स्वतः लावलेली होती. उद्यान शास्त्र आणि पीक शास्त्र विभागाच्या 87 विद्यार्थ्यांनी शेवंतीची विविध फुले असलेली झाडे प्रदर्शनात ठेवली.शेवंती प्रदर्शन सोबत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.त्यात विद्यार्थिनींनी महिला सक्षमीकरण यावर रांगोळ्या रेखाटल्या.प्राचार्य डॉ. काळे, उपप्राचार्य राधा सावणे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. उषा गलकर ,प्रा.कांनाव , प्रा. वारुटकर यांच्य उपस्थितीत करण्यात आले. प्रा.किरण लांजेवार, प्रा.जोशी, प्रा. बारेकर ,प्रा. आत्राम, प्रा.चिटणीस, प्रा.लता आत्राम व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक आचल भुते चा आणि शेवती प्रदर्शनात प्रथम क्रमांक नंदिनी गौरकर ने पटकाविला.