चंद्रपूर: दिनांक 27 व 28 जानेवारी 2024 ला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 55वा व वैराग्य मूर्ती गाडगे 67वा पुण्यस्मरण व कर्मयोगी संत पूज्य तुकाराम दादा यांच्या 109व्या जयंती सोहळा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यामधे परिसर स्वच्छता ,सामुदायिक द्यान,सामुदायिक प्रार्थना,भजन सम्मेलन,रक्तदान शिबिर,महिला सम्मेलन, कार्यकर्ता मेळावा, उद्घाटन सत्र, व कीर्तन व दिंडी पालखी सोहळा, व काल्याचे कीर्तन इत्यादी विविध कार्यक्रम झालेत. त्या मध्ये सकाळी दिनांक 27 जानेवारी ला सकाळी ग्रामसफाई करून 5 वाजता श्री बोभाटे महाराज यांच्या हस्ते घटस्थापना व सामुदायिक ध्यान झाले..भजन सम्मेलन मध्ये ,नागाला,शेनगाव, खुटाला, दाताला, छोटा नागपूर व चिंचाला,येथील भजन मंडळी नी सहभागी होऊन उत्साह वाढविला….त्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्याला युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून प्रतिसाद दिला..12 वाजता महिला सम्मेलन ,विधवा महिलांचा मानसन्मान हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घेण्यात आला होता..या मध्ये सौ. मालती ताई सगणे, व कु. संपद्रा चटप यांनी मार्गदर्शन केले. ठीक 2 वाजता कार्यकर्ता मेळावा या मध्ये राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेला प्रचारक या विषयावर प्रा.श्री गजानन अघडते सर यांनी श्रोत्यांना मार्गदर्शन केले. व लगेच ठीक 4 वाजता मौनश्रद्धांजली च्या कार्यक्रमाला सुरुवात झाली त्या मध्ये गायिका, कु.समीक्षा , व डॉ. कु. संस्कृती राजेंद्र आखरे, व आखरे परिवार व श्री गुरुदेव सेवा मंडळ भिवापूर वार्ड चंद्रपूर चे महिला मंडळ यांनी सुंदर श्रद्धांजली पर भजने गावून चींचाळा ग्रामवाशियांना भावविभोर केले.श्रद्धांजली घेऊन सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली..लगेच उद्घाटन या क्षत्रामध्ये कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ओम प्रकाश दादा यांनी उद्घाटनिय मार्गदर्शन केले प्रमुख पाहुणे म्हणून व्यसनमुक्ती प्रशिक्षक मारुती साव व डॉ झाडे यांनी मार्गदर्शन केले अध्यक्ष मार्गदर्शन श्री राजदादा घुमनर, श्री गुरुदेव सेवा मंडळ प्रचारक यवतमाळ यांचे झाले. लगेच ठीक 9 वाजता राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प प्रशांत महाराज ठाकरे अकोला यांचे क्रांतिकारी कीर्तन झाले. राष्ट्रवंदनीने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.. दिनांक 28 जानेवारीला सकाळी सामुदायिक ध्यानाने सुरुवात झाली व लगेच भव्यदिंडी सोहळा व पालखी सोहळ्यात संपूर्ण चिंचाळा ग्राम व महाकुर्ला, धानोरा, छोटा नागपूर, घुगुस, चंद्रपूर, दाताळा, खुटाळा, पडोली व परिसरातील भजनी मंडळींनी सहभागी होऊन चिंचाळा गावाला पंढरपूरचा स्वरूप आणलं होतं या दिंडी सोहळ्याचा समारोपीय मार्गदर्शन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री आस्वले सर व शाळेतील विद्यार्थिनी अक्षरा गायकवाड, तन्वी दहिवले व स्नेहलता जाधव यांनी केले व लगेच प्रा. डॉ.श्री. प्रशांत महाराज ठाकरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून खरा काला महाराजांनी समजावून सांगितला आरती व राष्ट्रवंदना व सामुदायिक प्रार्थना ने कार्यक्रमाची सांगता झाली व भव्य महाप्रसाद कार्यक्रम पार पडला, पंचक्रोशीतील लोकांनी प्रसादाचा आस्वाद घेतला..त्या सोबतच वांढरी..येथील भजन मंडळीनी भजने सादर करून महाप्रसाद सोबत भजनाचा आनंद दिला…