Homeचंद्रपूरशिक्षक भरतीची अखेर जाहिरात प्रसिद्ध आमदार सुधाकर अडबाले यांच्या सभागृहातील पाठपुराव्‍याला...

शिक्षक भरतीची अखेर जाहिरात प्रसिद्ध आमदार सुधाकर अडबाले यांच्या सभागृहातील पाठपुराव्‍याला यश राज्यात शिक्षकांची २१ हजार ६७८ पदे भरली जाणार

चंद्रपूर : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशनात २५ जुलै २०२३ रोजी तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी १५ ऑगस्ट २०२३ पासून राज्यात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल असे सभागृहात सांगितले. मात्र, प्रत्यक्षात शिक्षक भरती प्रक्रियेला सुरवात झालेली नाही. याबाबत आमदार अडबाले सतत सभागृहात पाठपुरावा करीत होते. अखेर शिक्षक भरतीसंदर्भात पवित्र पोर्टलवर ५ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्‍याने आमदार सुधाकर अडबाले यांच्या पाठपुराव्‍याला यश आले आहे.

राज्यात शालेय शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पदे शासन भरत नसल्याने रिक्त जागांचा आकडा दरवर्षी वाढत असतो, काही जागा समायोजन प्रकियेने भरण्यात येत असल्या तरी रिक्त जागांचा अनुशेष भरून निघत नसल्याने याचा विपरित परिणाम या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होत आहे. याबाबत आमदार अडबाले यांनी पावसाळी अधिवेशन २०२३ मध्ये शिक्षक भरती करण्याबाबत तारांकीत प्रश्‍न उपस्‍थित केला. यावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी १५ ऑगस्ट ते २४ ऑक्‍टोंबर २०२३ दरम्‍यान राज्‍यातील शिक्षकांच्या रिक्‍त पदांपैकी ३० हजार पदे पवित्र प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे उत्तर दिले होते. परंतु, १५ ऑगस्‍ट लोटूनही राज्याच्या शिक्षण विभागाला शिक्षक भरतीची प्रक्रिया कार्यवाही करण्यात अपयश आले.

राज्य शासनाने तातडीने शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी सातत्‍याने आमदार सुधाकर अडबाले सभागृहात व शिक्षण विभागाकडे करीत होते. अखेर त्‍यांच्या पाठपुराव्‍याला यश आले. शिक्षक भरतीसंदर्भात पवित्र पोर्टलवर ५ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली. राज्यात स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांसह खासगी शिक्षण संस्‍थांच्या शाळांमधील २१ हजार ६७८ रिक्‍त जागांवर शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. गेल्‍या एक वर्षांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या टीईटी धारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागपूर विभागातील नागपूर जिल्हा परिषद प्राथमिक विभागात ५०१, चंद्रपूर ३०७, भंडारा २८२, गोंदिया ४, गडचिरोली ११ तर वर्धा २२८ रिक्‍त पदे भरली जाणार आहे. आमदार सुधाकर अडबाले यांनी सतत केलेल्‍या पाठपुराव्‍याला यश आल्‍याने त्‍यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!