गोंडपिपरी:- तालुक्यात तेलंगणा सीमेलगतच्या गावात तेलंगणातील ताडी काढणारे ठेकेदार ताडी झाडावरून काढून पोडसा,वेडगांव,सोनापूर,हिवरा, सुपगांव,सकमूर, चेकदरूर,भंगारपेठ या पट्टयात पावडर मिसळून ताडी विकत आहे. हे तेलगू भाषिक असल्याचे यांची भाषा कळत नसली तरी ते लाठी व धाबा परिसरातील ताडाच्या झाडावर मडके बांधून ओरिजनल ताडी असल्याचे दाखविते.पण ते पहिलेच मडक्यात नशेचा पावडर टाकून ठेवतात व तीच ताडी झाडावरून उतरवून ग्राहकाला विकत आहे ताडी पिणाऱ्याच्या चेहरा फुलल्या सारखा दिसतो. ते ताडीचेच इन्फेक्शन असल्याचे बोलल्या जात आहे.आपल्या भागात ताडी उतरविणे व विक्री करणे यावर बंदी असताना हे परप्रांतीय लोक सीमा भागात ताडी कसे काय विकतात.याला कुणाचा पाठिंबा आहे. असे प्रश्न निर्माण होत आहे याकडे पोलिसांनी लक्ष मागणी आहे.