राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अथक प्रयत्नातून शासन स्तरावरून विकास निधी खेचून आणत विकासाचा झंजावात कायम ठेवून सिंदेवाही शहराच्या विकासाला गती दिली आहे. यात शहरातील पाथरी मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग वर उडान पुलाकरिता 90 कोटी, तसेच सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय दर्जा देऊन 50 खाटांचे अद्यावत रुग्णालय इमारत व कर्मचारी निवासस्थाने बांधकाम करिता 40 कोटी रुपये असा एकूण 130 कोटींचा विकास निधी मंजूर करून आज सदर दोन्ही विकास कामांचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले.
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या विकास संकल्पनेतून सत्ता काळात व आता विरोधी बाकावर असतांनाही क्षेत्राच्या विकासासाठी अथक प्रयत्न चालविले आहे. मतदार संघातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा व समस्यांना घेऊन शासन स्तरावरून कोट्यावधिंचा विकास निधी मंजूर करून घेत ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात विकासाचा झंजावात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुरू केला आहे. सिंदेवाही – पाथरी मार्गावर असलेल्या रेल्वे क्रॉसिंग वर उडान पूल नसल्याने सदर मार्गावरील वाहतूकदारांना तासंतास मर्गक्रमनासाठी ताटकळत राहावे लागत होते. यावर उपाय म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शासन स्तरावरून 90 कोटी रुपये असा भरघोस निधी मंजूर करून घेत याठिकाणची वाहतूक समस्या कायमस्वरूपी सुटावी म्हणून रेल्वे क्रॉसिंग वर उडान पूल बांधकामाची संकल्पना आखली व ती लवकरच पूर्णत्वास येणार असून त्याचे भूमिपूजन ही पार पडले.
तसेच सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालय याला उपजिल्हा रुग्णालय समान दर्जावर्धनातून येथील 30 खाटांचे रुग्णालय हे आता 50 खाटांचे अद्यावत रुग्णालय होणार असून प्रशस्त अशी रुग्णालय इमारत व कर्मचारी निवासस्थानी बांधकाम याकरिता 40 कोटी रुपयांचा विकास निधी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंजूर करून घेतला. या कामाचे देखील भूमिपूजन आटोपले असून लवकरच सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालय कात टाकणार असून सिंदेवाही शहर व तालुक्यातील तसेच परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा देखील मिळणार. मागील आठवड्यात सिंदेवाही शहरात एकूण 35 कोटींची विकास कामे व सलग दुसऱ्या आठवड्यात 130 कोटींची विकास कामे असा एकूण 165 कोटींचा विकास निधी मंजूर करून संपूर्ण सिंदेवाही तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणार असा माणूस राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
आयोजित भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी प्रामुख्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रघुनाथजी शेंडे, बाबुरावजी गेडाम तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमाकांत लोधे, उपाध्यक्ष संजय गहाने, मधुकर पा. बोरकर,शहराध्यक्ष सुनील उट्टलवार, कृउबा समिती उपसभापती दादाजी चौके,महिला आघाडी अध्यक्ष सीमा सहारे, नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, उपनगराध्यक्ष मयूर सूचक, महिला शहराध्यक्ष प्रीती सागरे, युवक अध्यक्ष अभिजीत मुप्पिडवार, तथा काँग्रेस पक्षाचे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते तथा नगरपंचायतीचे नगरसेवक नगरसेविका, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.