मुलचेरा : बंजारा समाजाचे आराध्या दैवत, संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज शूरवीर लढवय्या बंजारा समाजाचे सतगुरू आहेत. क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा २८५ व्य जन्मदिनी निमित्या काल १५ फेब्रुवारीला गडचिरोली जिल्ह्यात मूलचेरा तालुक्यातील लबानतांडा येथील बंजारा बांधवानी येथील संत सेवालाल महाराजांचे मंदिर ठिकाणी जयंती उत्सव कार्यक्रम आयोजित केली आहे.
आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी जयंती कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित दर्शवून या कार्यक्रमाला मार्गदर्शन केली.
सर्व प्रथम संत सेवालाल महाराजांचे दर्शन घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यावेळी अजय कंकडालवार यांचा येथील बंजारा समाज कडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आली. संत सेवालाल महाराज यांचे जयंती कार्यक्रम मोठ्या उत्सवात पार पाडले.
जयंती कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना येथील बंजारा बांधवांनी येथील प्रत्येक समस्या माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या समोर मांडले होते. येथील प्रमुख समस्या म्हणजे लबानतांडा येथील बंजारा बांधवानी संत सेवालाल महाराज्यांचे मंदिर बांधकाम सुरु केली. मंदिर अर्दावाट झाले होते. पुढील बांधकाम करण्यासाठी येथील बंजारा समाज बांधवांनी अडचण भासत होती. या ही अडचण अजय कंकडालवार यांना सांगतच तात्काळ मंदिरसाठी मेटेरियल तसेच रोक रक्कम देऊन आर्थिक मदत केली आहे.
त्यावेळी अजय कंकडालवार यांनी येथील नागरिकांना सांगितले की हा एकच समस्या नाही आपल्या गावातील प्रत्येक समस्या निराकरण करण्यात येईल, अशी नागरिकांना आश्वासन दिले आहे. त्यावेळी बंजारा बांधवानी तसेच येथील समस्त नागरिकांनी अजय कंकडालवार यांचे आभार मानले आहे.
त्यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी सुद्धा या कार्यक्रमाला मार्गदर्शन करून आर्थिक मदत केली आहे.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित भावकर पोलीस निरीक्षक मुलचेरा, चल्लावार, अशोक येलमुले माजी सरपंच वेलगुर, प्रमोद, कमलेश सरकर, कन्नाके ग्रामपंचायत सदस्य, बानेव, याकब बानुके, गिरमा चव्हाव माजी सरपंच, चीना धूगलेत, रामुलु भुक्या, काशिराम धुगलोत, सुनीता बानोत, बोरकुटे, मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, प्रमोद गोडसेलवार, सचिन पंचार्यासह बंजारा समाजाचे नागरिक तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.